कोकणताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रब्रेकिंगमराठवाडामुंबईराजकियराज्यविदर्भसातारा

भाजपाचे 70 नवे जिल्हाध्यक्ष : सातारा जिल्हाध्यक्षपदी धैर्यशील कदमांची नियुक्ती

-विशाल वामनराव पाटील
भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक रचनेतील महत्वपूर्ण दुवा असलेल्या जिल्हाध्यक्षांची नवी टीम जाहीर करत आहे. राज्यातील केंद्रीय नेतृत्व, राज्याचे नेतृत्व आणि प्रदेश कार्यकारिणीशी चर्चा करून 70 संघटनात्मक जिल्हाध्यक्षांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विटद्वारे दिली आहे. यामध्ये सातारा जिल्हाध्यक्षपदी धैर्यशील कदम यांची नियुक्ती केली आहे.

वर्धन अॅग्रो कारखान्याचे चेअरमन व कराड उत्तरचे भाजपचे नेते धैर्यशील कदम यांच्या निवडीमुळे कराड उत्तर मतदार संघातील भाजच्या कार्यकर्त्यांच्यात उत्साहाचे वातावरण आहे. गेल्या दोन विधासभेच्या निवडणुकीत त्यांनी एकदा काॅंग्रेस तर एकदा शिवसेनेतून निर्णायक मते मिळवली होती. त्यानंतर त्यांनी काही दिवसापूर्वी भाजपात प्रवेश केला होता. आता त्यांच्यावर जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी मिळाल्याने त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे. मावळते जिल्हाध्यक्ष जयकुमार गोरे यांच्या पुढाकारातूनच धैर्यशील कदम यांची नियुक्ती झाल्याचे सांगितले जात आहे.

मला खात्री आहे, माझे नवनियुक्त सहकारी पक्षासाठी आपली संपूर्ण शक्ती पणाला लावतील. या सर्वच सहकाऱ्यांच्या सोबतीने 2024 च्या महाविजयासाठी आम्ही सज्ज होत आहोत. भाजपा नव्या भारताच्या उभारणीसाठी कटिबध्द आहे. पक्षाच्या बांधणीत कार्यकर्त्यांचे योगदान सर्वोच्च आहे. पक्षासाठी कार्यकर्ते सर्वस्व असून त्यांच्या अविश्रांत कष्टामुळे पक्षाने आज नवी उंची गाठली आहे. नवनियुक्त सर्व जिल्हाध्यक्षांनी सर्वांना सोबत घेऊन पक्ष मजबूत करायचा आहे. सर्वांना माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा, असे ट्विट प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे.

 

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker