क्राइमताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रराज्यसातारा

लाच मागणीचा गुन्हा नोंद : मंडलाधिकाऱ्याकडून 50 हजारांची मागणी

सातारा | तक्रारदार यांच्या जमिनीतून स्वखर्चाने गाळ, मुरूम, माती काढून वाहतूक करण्याकरिता भाड्याने वापरलेली वाहने जप्त करू नयेत म्हणून मंडलाधिकाऱ्याने 50 हजारांची लाचेची मागणी करून 40 हजार रूपयांवर तडजोड करण्यात आली. याबाबतची फिर्याद 67 वर्षीय व्यक्तीने दिली आहे. याबाबतची माहिती पोलीस उप अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सातारा श्रीमती उज्वल अरूण वैद्य यांनी दिली आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी, तक्रारदार यांचे मौजे मोरबंदवाडी गावचे गट नंबर 28 मधील जमिनीतून स्वखर्चाने गाळ ,मुरूम, माती काढून वाहतूक करण्याकरता भाड्याने वापरलेला जेसीबी व ट्रॅक्टर जप्त न करण्यासाठी तसेच गौण खनिज कायद्याअंतर्गत कारवाई न करण्याकरिता पैशाची मागणी केली होती. लोकसेवक संजय रावसाहेब बोबडे (वय- 58 वर्षे, पद- मंडलअधिकारी- पिंपोडे बु// ता. कोरेगाव) यांनी तडजोडीअंती 40,000/- रुपये लाचेची मागणी केली होती. या प्रकरणी वाठार पोलीस ठाण्यात लाच मागणीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक डाॅ. शीतल जानवे/खराडे, सातारा पोलीस उप अधीक्षक श्रीमती उज्वल अरूण वैद्य, पोलीस निरीक्षक विक्रम पवार, पोहवा नितीन गोगावले, पोना निलेश राजपुरे, पोकॉ विक्रमसिंह कणसे,

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker