आ. बाळासाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आठवडाभर विविध ठिकाणी सर्वरोग निदान शिबिर

मसूर प्रतिनिधी। गजानन गिरी
राज्याचे माजी सहकार व पणनमंत्री आमदार बाळासाहेब पाटील यांच्या दिनांक 29 जुलै रोजीच्या वाढदिवसानिमित्त कराड उत्तर मतदार संघातील नागठाणे, रहिमतपूर, पुसेसावळी, उंब्रज, मसूर व ओगलेवाडी आदी ठिकाणी सर्वरोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती आमदार बाळासाहेब पाटील वाढदिवस समितीच्यावतीने देण्यात आली.
सदरचे शिबिर आज रविवार दिनांक 23 जुलै रोजी नागठाणे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या इमारतीमध्ये, सोमवार दिनांक 24 जुलै रोजी उंब्रज येथील श्रीराम मंगल कार्यालय शिवडे फाटा येथे, मंगळवार दिनांक 25 जुलै रोजी रहिमतपूर, बाजारपेठ येथील विरशैव लिंगायत मठ येथे, बुधवार दिनांक 26 जुलै रोजी दिनांक मसूर येथील सिद्धेश मंगल कार्यालय येथे, 27 जुलै रोजी वडगाव ज.स्वा येथील सांस्कृतिक भवनमध्ये व दिनांक 28 जुलै रोजी ओगलेवाडी येथील मयूर मल्टीपर्पज हॉल येथे सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत पार पडणार आहे. सदर शिबिरासाठी सह्याद्री मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल कराड, सातारा व पुणे येथील तज्ञ डॉक्टर्स उपस्थित राहून आरोग्य तपासणी करणार आहेत.
सदर शिबीरामध्ये हृदयरोग – इलेक्ट्रो कार्डिओग्राम (ECG), उच्च रक्तदाब, अस्थिरोग (आर्थो आणि फिजिओथेरेपी) मधुमेह – रक्तातील साखर तपासणी, साखर वाढीमुळे होणारे आजार, नेत्ररोग, कॅन्सर संदर्भात तपासणी व मार्गदर्शन, स्त्री रोगावरील मार्गदर्शन व प्रथोमपचार इ. महात्मा जोतिबा फुले योजनेअंतर्गत मोफत ऑपरेशन सुविधा संदर्भात माहिती देण्यासाठी सह्याद्रि हॉस्पिटलचे तज्ञ डॉक्टर व स्टाफ उपस्थित राहणार आहेत, गरजुंनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार बाळासाहेब पाटील वाढदिवस समिती यांच्यावतीने करण्यात आले आहे.