Satara Crime : वृध्द थोरल्या भावाने केला धाकट्या भावाचा खून

कोरेगाव | गणेशवाडी- किन्हई (ता. कोरेगाव) येथे वडिलोपार्जित जमिनीच्या वहिवाटीच्या वादातून वृद्ध थोरल्या भावाने आपल्या वृद्ध सख्ख्या धाकट्या भावाचा खून केला. राजाराम बापूराव घाडगे (वय- 61) असे मृताचे नाव आहे. संभाजी बापूराव घाडगे (वय- 64) या संशयितास अटक करण्यात आलेल्या थोरल्या भावाचे नाव आहे. याबाबत सुरेखा राजाराम घाडगे (वय- 54, रा. गणेशवाडी) यांनी येथील पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संभाजी घाडगे आणि राजाराम घाडगे यांच्यामध्ये वडिलोपार्जित शेतजमिनीच्या वहिवाटीवरून वाद होता. जून 2021 मध्ये त्यांच्यात भांडण झाले होते. जमिनीचा वाद व भांडणाचा राग मनामध्ये धरून संभाजी घाडगे याने त्याच्या हातात असलेल्या सोलण्याच्या हातयंत्र लहान भाऊ राजारामच्या डोक्यात मारून व दगडाने पाठीत मारले. यामध्ये राजाराम गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी सातारा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांचे निधन झाले.
याप्रकरणी संभाजी घाडगे याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाला असून, त्यास अटक करण्यात आली आहे. दरम्यान, घटनास्थळी पोलिस उपअधीक्षक गणेश किंद्रे यांनी भेट देऊन तपासाच्या सूचना केल्या. अधिक तपास पोलिस निरीक्षक अशोक राऊत करत आहेत.