कराड उत्तर व दक्षिणमध्ये काॅंग्रेसचा फटाके वाजवून जल्लोष
कराड प्रतिनिधी सकलेन मुलाणी
कर्नाटक राज्यात काँग्रेसने मिळवलेल्या विजयाचा कराड उत्तर मतदार संघ तसेच कराड शहरात काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. फटाक्याची आतिषबाजी व घोषणाबाजी करत विजयाचा जल्लोष करण्यात आला. कराड उत्तरचे अध्यक्ष निवास थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली जल्लोष करण्यात आला.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने पूर्ण बहुमत मिळवले .यामुळे देशभरातील सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला. यानिमित्त कराड उत्तरच्या काँग्रेस कार्यकर्ता व पदाधिकाऱ्यांच्या वतीने कर्नाटक विजयाचे जल्लोषी स्वागत करण्यात आले. यावेळी फटाक्याची आतिषबाजी करत काँग्रेसचे राहुल गांधी, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा जयघोष करीत आनंद उत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी निवास थोरात म्हणाले, आज पर्यंत भाजपने मोठ्या चुका केल्या. वाढती महागाई तसेच लोकांच्या मनामध्ये जाती धर्माविषयी तेढ निर्माण करून गैरसमज निर्माण करण्याचे काम केले आहे. भाजपाच्या या चुकीच्या वागणुकीची प्रत्येकाने जाण ठेवून येत्या 2024 च्या निवडणुकीत भाजपचे पानिपत करून काँग्रेसला विजयी करावे, असे आवाहन केले.
कराड शहरातही काॅंग्रेसचा जल्लोष
या वेळी कराड दक्षिण काँग्रेसचे अध्यक्ष मनोहर शिंदे, युवा नेते इंद्रजित चव्हाण, कराड दक्षिण युवक काँग्रेसचे अध्यक्ष दिग्विजय पाटील, अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष झाकिर पठाण, प्रदीप जाधव, अशोकराव पाटील, युवक काँग्रेसचे पदाधिकारी अमोल नलावडे, सुहास थोरात, देवदास माने, गणेश सातारकर, आमीर कटापुरे, योगेश लादे, गणेश गायकवाड, राहुलराज पवार, अनिल माळी, शरद पाटील, विजय पाटील, मुबिन बागवान, शाहरुख मुल्ला, शरीफ मुल्ला, नईम पठाण, श्रीतेज लादे, अजीम मुजावर, मुकुंद पाटील, संग्राम काळभोर, किरण पांढरपट्टे, ओमकार बनसोडे आदी या वेळी उपस्थित होते..