कराडला चित्राताईंचा त्रागा : बॅंनर… बॅंनर… बॅंनर कुठेयं

कराड ः पश्चिम बंगाल येथील संदेशखली येथे झालेल्या महिला अत्याचाराच्या निषेधार्थ भाजपाच्यावतीने देशभर निदर्शने करण्यात येत आहेत. याचा भाग म्हणून भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष व भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य चित्रा वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत कराड येथील कोल्हापूर नाक्यावरील महात्मा गांधी पुतळ्याजवळ निदर्शने करण्यात आली. यावेळी चित्रा वाघ चांगल्याच चिडल्या अन् खवळल्याही.
कराड येथे तृणमूल काॅंग्रेसच्या मुख्यमंत्री ममता बॅंनर्जी आणि पश्चिम बंगाल सरकारचा सकाळी 10 वाजता निषेधार्थ निदर्शने देण्यात येणार होती. यासाठी भाजपाच्या चित्रा वाघ उपस्थित राहणार असल्याने जवळसाप शंभर महिलांनी उपस्थिती लावली होती. चित्रा वाघ आल्यानंतर कोल्हापूर नाका येथील महात्मा पुतळ्यास अभिवादन करून घोषणा देण्यात आल्या. भाजपाकडून उपस्थित महिलांच्यात येत चित्रा वाघ घोषणा देण्यासाठी रस्त्यावर उतरल्या, तेव्हा निषेधाचे बॅंनर दिसले नाहीत. त्यावर बॅंनर कुठे आहेत, असे प्रदेश कार्यकारणीतील महिलेस विचारले असता त्या गोंधळून गेल्या.
मोर्चात बॅनर दिसत नसल्याने चित्रा वाघ चांगल्याच चिडल्या, खवळल्या अन् बॅंनर, बॅंनर, बॅंनर म्हणत चक्क रस्त्याशेजारीच एका कट्ट्यावर ठिय्या मारला. तेथे कार्यकर्त्यांशी बातचीत करेपर्यंत काही वेळात बॅंनर आणण्यात आले अन् मगच निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. या मोर्चाला सातारा जिल्ह्यातून महिला पदाधिकारी आल्या होत्या. यामध्ये नुकताच भाजपात प्रवेश केलेल्या रहिमतपूरच्या चित्राताई कदम, कराडच्या माजी नगराध्यक्षा रोहीणी शिंदे, कविता कचरे यांच्यासह महिलांनी उपस्थिती लावली.