शास्ञीनगर मधील समस्या सोडवण्यासाठी कटिबध्द :- आमदार डाॅ.अतुलबाबा भोसले
भा.ज.पा.तालुका उपाध्यक्ष तानाजी देशमुख यांनी विविध समस्यांचे निवेदन

मलकापूर – येथील शास्ञीनगर विभागातील नागरिक, विद्यार्थी, व्यावसायिकांच्या वतीने या विभागातील सामाजिक कार्यकर्ते भा.ज.पा.तालुका उपाध्यक्ष तानाजी देशमुख यांनी विविध समस्यांचे निवेदन आमदार अतुलबाबा भोसले यांना दिले. यावेळी परिसरातील रहिवाशी, व्यावसायिक बहुसंख्येने उपस्थित होते.
आमदार डाॅ.अतुलबाबा भोसले म्हणाले, मलकापूर शहराची भौगोलिक रचना पाहता शहराची वाढ झपाट्याने होताना दिसत आहे. त्यामुळे नागरिकांच्या समस्या देखील वाढत आहेत आगामी काळामध्ये या विभागातील समस्यांबाबत धोरणात्मक निर्णय घेतले जातील. शहरविकासाच्या दृष्टीने ज्या काही उपाययोजना कराव्या लागतील. त्यांची अंमलबजावणी करुन लोकहिताचा विचार करुन त्या सोडवण्यासाठी मी कटिबध्द आहे.
आ.भोसले यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शास्ञीनगर विभाग महामार्गाच्या पूर्व पश्चिम बाजूस वसलेले आहे. या ठिकाणी पंकज हाॅटेल ते नांदलापूर फाटा या दरम्यान ३.५ कि.मी. ९३ पिलरवर उड्डाणपूल तयार होत आहे, पूर्वी या विभागातील नागरिक, विद्यार्थी, व्यावसायिक, रहिवाशी यांना ये- जा करण्यासाठी पादचारीमार्ग (स्कायवाॅक) अस्तित्वात होता. परंतू नविन पूलाच्या कामामुळे तो पाडण्यात आल्याने येथील नागरिकांना गैरसोईला सामोरे जावे लागत आले. या ठिकाणी बालसुधारगृह (रिमांडहोम) सार्वजनिक बांधकाम विभागाची कार्यालये, हुतात्मा स्मारक, शाळा, महाविद्यालये, दवाखाने, रहिवाशी यांची संख्या लक्षणीय आहे. भविष्यातील वाहतुकीच्या निर्माण होणार्या समस्या टाळण्यासाठी उड्डाणपूल पिलर क्र ७१ ते ७५ दरम्यान कायमस्वरुपी रस्ता क्राॅसिंगची (ओपनिंग जंक्शन) निर्मिती करण्यात यावी. यामुळे या विभागातील लोकांना दळणवळणाच्या दृष्टीने सोईचे होईल, असे आ.भोसले यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
आमदार भोसले यांना निवेदन देण्यात आले असून यावेळी नंदकुमार गायकवाड, शकिल मोमीन, विठ्ठल थोरात, विजय देशमुख, बबन वास्के, तेजस सोनवले, फारुक बागवान, राजेंद्र शिंगण, मंगेश सुरवसे, सुनिल मगदूम, सागर माने, अभिजित रैनाक, रामेश्वर महाराज, आण्णा डिसले, विकास शेवाळे, राहूल केंगार, संभाजी शेडगे, रोहित माने, असद तिगडीकर, विकास तिवारी, विजय जाधव यांच्यासह नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.