काँग्रेस म्हणजे ब्लड कॅन्सर 65 वर्ष कन्फ्यूज करण्याचं राजकारण केलं : चंद्रशेखर बावनकुळे
सातारा प्रतिनिधी | वैभव बोडके
आम्ही साताऱ्यात लेखाजोखा मांडू तेव्हा महायुतीचाच लोकसभेला उमेदवार निवडूण येईल. आम्हाला आत्मविश्वास आहे. काॅंग्रेस पक्षात ब्लड कॅन्सर आहे. काॅंग्रेसच्या रक्तात कन्फ्यूज करण्याचं राजकारण आहे. काॅंग्रेसचं 65 वर्ष सरकार हे कन्फ्यूज करण्याच चाललं कन्व्हेन्स करण्याच नाही. काॅंग्रेस डेव्हलपमेंटच काही सांगणार नाही. भाजप मोदींनी, देवेंद्रनी आणि शिवेंद्रराजेंनी केलेली काम सांगणार आहे. आम्ही आमची काम सांगून मत घेणार आहे. आम्ही जो व्यक्ती कन्फ्यूज झालेल आहे त्याला कन्व्हेन्स करण्यासाठी निघालो असल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.
सातारा येथे लोकसभा प्रवास दाैऱ्यानिमित्त ते माध्यमांशी ते बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, आ. जयकुमार गोरे, माजी आ. मदनदादा भोसले यांच्यासह जिल्ह्यातील भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुढे श्री. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, महाविकास आघाडीत मायावी लोक आहेत. मी उध्दव ठाकरे यांनी जी काही 28 पक्षाची इंडिया आघाडी केली आहे. त्यामधील त्याचा घटक पक्ष हिंदू संस्कृती संपू म्हणाला आहे. तेव्हा त्यांना मान्य आहे का ते त्यांनी जनतेत सांगावी. जनता यांना धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही.
“जे ठरलं होतं तेच झालं” भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची पालकमंत्री बदलावर प्रतिक्रिया
पालकमंत्री बदलाबाबत सर्व अधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आहे, जे ठरलं होतं तेच झालं आहे. नवीन पालकमंत्री मिळाल्यामुळे अधिक परफॉर्मन्स आणि वेगवेगळ्या योजना योजना यामधून चालना मिळणार आहे. अशी अशी प्रतिक्रिया पालकमंत्री बदलावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. आज नव्याने 11 जिल्ह्याच्या पालकमंत्री निवडीबाबत श्री. बावनकुळे म्हणाले, पालकमंत्री जादा मिळाल्याने जिल्ह्यांना विकासकामात न्याय मिळेल. अजित पवार कधीही नाराज नव्हते, ते कधीही नाराज होत नसतात. या निवडीत राजकीय रंग आणू नये. एका व्यक्तीवर 4 जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी होती, आता प्रत्येकाला वेगळी जबाबदारी मिळाल्याने विकास कामे गतीने होतील.