क्राइमताज्या बातम्यापर्यटनपश्चिम महाराष्ट्रपुणेब्रेकिंगराज्यसांगलीसातारा

छमछम हायप्रोफाईल पार्टी : सातारा, सांगली, पुणे जिल्ह्यातील डाॅक्टरांचा युवतीसोबत नाच

सातारा प्रतिनिधी | वैभव बोडके
निसर्गरम्य पाचगणी- कासवंड येथे ‘स्प्रिंग रिसोर्ट’वर रात्री पोलिसांनी छापा टाकून चार युवतींसह 9 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. सातारा जिल्ह्यातील पाच डॉक्टर, मिरज मधील एक आणि पुण्याचा फार्मासिस्ट असे हॉटेल मालकासह एकूण 9 जण ताब्‍यात घेतले आहेत. हायप्रोफाईल पार्टीमुळे सातारा जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे

याबाबत पाचगणी पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी, महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणी जवळच असणाऱ्या कासवंड गावातील ‘स्प्रिंग रिसॉर्ट ‘ मध्ये डॉक्टरांसमोर युवतींचे तोकड्या कपड्यात बीभत्स हावभाव, अंगविक्षेप करत, नृत्यासह पार्टी चालू असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख आचल दलाल यांना मिळाली. त्यावरून साताऱ्यावरून विशेष पथक पाचगणी कासवंड येथे रवाना करण्यात आले. पोलिस पथक घटनास्थळावर पोहोचताच रात्री दहा वाजनेचे सुमारास पाचगणी कासवंड येथील स्प्रिंग रिसॉर्टच्या तळमजल्यात सातारा जिल्ह्यातील पाच डॉक्टर व मिरज येथील एक असे सहा ते सात जण दारूच्या नशेत नर्तिकांच्या समोर झिंगत असतानाच रंगेहाथ पोलिसांना सापडले. छापा टाकला त्यावेळी नर्तिका नाचत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी कारवाई करत चार महिला त्यांच्यासमवेत नाचणाऱ्या सहा डॉक्टर व एक फार्मासिस्ट रिसॉर्ट चालक असे एकूण नऊ जणांच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे.

पाचगणी पोलीस पोलिस ठाण्यात यातील सहभागी विशाल सुरेश शिर्के (वय- 36 वर्ष, रा. पसरणी), उपेंद्र उर्फ कृष्णा दयावंत प्रशादकोल (वय- 31 वर्ष, रा. स्प्रिंग व्हॅली रिसॉर्ट, कासवंड), डाॅ. रणजीत तात्यासाहेब काळे (वय- 43 वर्षे, रा. बाजार पटांगण दहिवडी), डाॅ. निलेश नारायण सन्मुख (वय- 39 वर्षे. लक्ष्मी मार्केट ,मिरज, जि. सांगली), प्रवीण शांताराम सैद (वय- 40 वर्ष. रा. आलडीया, माळुंगे पाडळे, पुणे), डाॅ. मनोज विलास सावंत (वय- 40 वर्षे, रा. जयवंत नगर ,दहिवडी), डाॅ. महेश बाजीराव साळुंखे (वय- 40 वर्षे, रा. मलकापूर- कराड), डाॅ. राहुल बबन वाघमोडे (वय- 31 वर्षे रा. गोंदवले), हनुमंत मधुकर खाडे (वय- 65 वर्षे, रा. दहिवडी) अशा नऊ जणांवर पांचगणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेची फिर्याद उमेश रामचंद्र लोखंडे (वय 32 वर्ष) पोलीस कॉन्स्टेबल यांनी पांचगणी पोलिसात दिलीं आहे. अधिक तपास पांचगणी पोलीस ठण्याचे सहायक पोलिस निरीक्षक राजेश माने करीत आहेत.

सातारा पोलिसांचा पर्यटकांना इशारा
पाचगणी कासवंड मधील एका रिसॉर्टवर गैरकृत्य सुरू होते. यावरून चालक- मालक तसेच पर्यटकांवर गुन्हे दाखल केले आहेत. पाचगणी पोलीस पूढील तपास करीत आहेत.याबरोबरच येणाऱ्या काळात आपण नाताळ आणि नववर्ष साजरे करणार आहोत. सर्व हॉटेल,रिसॉर्ट चालक, मालक आणि पर्यटक यांनी याही काळात कायद्याचे पालन करून, कायद्याच्या चौकटीत राहून सर्व सण उत्सव साजरे करावेत.जर अस झालं नाही,तर संबंधित लोकांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा सातारचे जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दिला आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker