क्रिकेट नादखुळा : कालेचा युवक IPL Dream 11 मुळे बनला कोट्याधीश
कराड | सध्या IPL क्रिकेट सुरू असून तरूणांच्यासह भारतात मोठ्या प्रमाणात सामने पाहिले जातात. भारतात सर्वात जास्त क्रिकेटवेडे आहेत, असेही म्हटले जाते. त्यामुळेच आॅनलाईन IPL Dream 11 मोठ्या प्रमाणात क्रिकेट खेळले जाते. या खेळामुळे अनेकांचे पैसे बुडतात, परंतु काहीजण बक्कळ पैसा कमवतानाही दिसत आहेत. कराड तालुक्यातील एका युवकाने चक्क या IPL Dream 11 मध्ये 1 कोटी 20 लाख रूपये जिंकले आहेत.
शनिवारी रात्री गुजरात विरूध्द लखनऊ क्रिकेट सामना झाला. कालेटेक (ता. कराड) येथील सुहास यादव या युवकाने IPL Dream 11 खेळला. या सामन्यात त्याने तयार केलेल्या टीममुळे तो कोट्याधीश बनला. सुहास यादव याने तयार केलेल्या टीममुळे त्याला 1 कोटी 20 लाख रूपये जिंकता आले. त्यापैकी टीडीएस कपात होवून त्याच्या अंकाऊंटवर 84 लाख रूपये जमा झाल्याचे त्याने सांगितले.
सुहास यादव याने IPL Dream 11 मध्ये एवढी मोठी रक्कम जिंकल्याचे समजता. त्याच्या मित्र परिवार तसेच कुटुंबातील सदस्यांच्यात आनंदाचे वातावरण पहायला मिळाले. काही स्वप्न पैशामुळे अपुरी होती, ती आता पूर्ण करेंन असे सुहास यादव यांने सांगितले आहे.