ज्योतीर्लिंग पतसंस्थेच्या तज्ञ संचालक पदी डी. के. देसाई (सर) यांची वर्णी
कराड। आणे (ता. कराड) येथील ज्योतिर्लिंग पतसंस्थेची 2022- 23 ते 2027- 28 या कार्यकाळासाठी नुकतीच संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध पार पडली. यामध्ये तज्ञ संचालक म्हणून डी. के. देसाई (सर) यांची निवड करण्यात आली. त्यांनी यापूर्वी सन 2011-12 ते 2015-16 या कालावधीमध्ये सुद्धा तज्ञ संचालक म्हणून काम पाहिले आहे.
त्यांच्या या निवडीबद्दल संस्थापक चेअरमन जयवंतराव पाटील, विद्यमान चेअरमन एल. जी. देसाई, व्हाईस चेअरमन रवींद्र जाधव, मुख्य व्यवस्थापक विकास देसाई यांच्यासह सर्व आजी- माजी संचालक व सर्व शाखांचे शाखाप्रमुख, कर्मचारी वर्ग यांनी अभिनंदन केले. पुणे विभाग माध्यमिक शिक्षक पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन गुलाबसिंग कदम आणि विद्यमान चेअरमन श्री. रणवरे (सर) यांनी या निवडीबद्दल डि. के. देसाई (सर) यांचा सत्कार केला.
संस्थेचे संस्थापक चेअरमन जयवंतराव पाटील म्हणाले, डी. के. देसाई सर यांनी यापूर्वीही संस्थेचे तज्ञ संचालक म्हणून काम पाहिले आहे, यापुढेही ते संस्थेच्या प्रगतीत आपले बहुमोल योगदान देतील. सरांनी पुणे विभाग माध्यमिक शिक्षक- शिक्षकेत्तर पतसंस्थेत संचालक म्हणून 10 ते 11वर्ष काम पाहिले आहे. त्याच्या आजपर्यंतच्या सामाजिक, शैक्षणिक कार्याचा अनुभव नक्कीच संस्थेस होईल, असा विश्वास आहे.