महाबळेश्वरला सेल्फी घेताना 300 फूट खोल दरीत पडून पुण्यातील पर्यंटक महिलेचा मृत्यू
सातारा प्रतिनिधी | वैभव बोडके
महाराष्ट्राचे मिनी काश्मीर म्हणून अोळखले जाणाऱ्या महाबळेश्वर येथे पर्यंटक महिलेला सेल्फी घेण्याच्या मोहाने जीव घेतला आहे. महाबळेश्वर येथील केट्स पॉईंटवर फिरण्यासाठी आलेल्या अंकिता सुनिल शिरसकर (वय- 23) असे दरीत तोल कोसळून मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. पुण्याहून आलेल्या पतीसोबत आलेल्या पर्यटक महिला सेल्फी काढत असताना अचानक तोल गेल्याने 300 फूट खोल दरीत पडली.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, पुण्याहून महाबळेश्वरला पर्यटनासाठी पतीसोबत अंकिता आली होती. आज मंगळावारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास केट्स पाॅईंटवर सेल्फी घेताना अंकिता हिचा तोल जावून त्या 300 फूट खोल दरीत कोसळल्या. त्यानंतर महाबळेश्वर ट्रेकर्स आणि सह्याद्री ट्रेकर्सला मिळताच घटनास्थळी धाव घेवून शोधकार्य सुरू करण्यात आले होते.
या दुर्घटनेची माहिती मिळताच पर्यंटकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. या दुर्घटनेमुळे पर्यटकांच्यात भीतीचे वातावरण पहायला मिळाले. महाबळेश्वर पोलिस अधिक माहिती घेत असून संबंधित महिलेचा मृतदेह दरीतून वर काढण्यात आला.