विजयनगर येथे एसबी मॅरेथाॅन स्पर्धेत दिल्लीचा अक्षय कुमार पहिला
सुनिल बामणे मित्र परिवाराच्यावतीने आयोजित मॅरेथाॅनला 550 स्पर्धकांचा सहभाग

कराड | विजयनगर येथे एसबी मॅरेथाॅन स्पर्धेत दिल्लीच्या अक्षय कुमार याने पहिला नंबर पटकावला. तर अंकुश हाके (सांगली) आणि प्रदीप राजपूत (संभाजीनगर) यांनी खुल्या गटात दुसरा व तिसरा क्रमांक पटकावला. सुनिल बामणे मित्र परिवाराने आयोजित केलेल्या या स्पर्धेला महाराष्ट्रासह दिल्लीतील जवळपास 550 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला.
एसबी मॅरेथॉन स्पर्धेचे उद्घाटन कराड तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय पाटील, हिंदकेसरी पैलवान संतोष (आबा) वेताळ, युवा उद्योजक सुनील बामणे आणि कराड कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सुनील पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. पंच म्हणून कैलास माने, जार्ज थामन्स, अतुल पाटील, शशिकांत पाटील, अर्जून कळंबे, अनिल काटकर यांनी काम पाहिले. यावेळी आनंदा कळके, दादा सावंत, कृष्णत सावंत, मंगेश महापुरे, संजय वाघमारे आदी उपस्थित होते. या स्पर्धेचे सूत्रसंचालन वासू पाटील, महेंद्र भोसले यांनी केले.
वयोगट 12 वर्षाखालील मुले विजेते पुढील प्रमाणे ः- बजरंग चव्हाण, अवधूत सुर्वे, पवन सपकाळ, (मुली) ः- अबोली वास्के, आराध्या वास्के, प्रज्ञा पाटोळे. वयोगट 12 ते 14 वर्षे मुले विजेते पुढीलप्रमाणेः- शंतनू नवघणे, ओम गाढवे, सिद्धेश कुरणे. (मुली) ः- आदिती हरगुडे, आकांक्षा देवकर, श्रावणी गरुड. वयोगट 18 ते 35 वर्षे खुला गट मुले विजेते पुढीलप्रमाणे ः- अक्षय कुमार (दिल्ली), अंकुश हाके (सांगली), प्रदीप राजपूत (संभाजीनगर). (मुली) ः- प्राची देवकर (किरपे), साक्षी जड्याळ (चिपळूण), वैष्णवी सावंत (म्हसवड).
वयोगट 14 ते 18 वर्षे मुले – ऋतिक वर्मा, संस्कार पिंगळे, अथर्व ताटे. (मुली) ः- मानसी यादव सानिका नलवडे शिवाजी देवकर वयोगट 35 वर्षे वरील गट विजेते ः- निवास हंगे, अंकुश माळी, अरविंद जाधव. (महिला)ः- रितू उनवणे, तृप्ती वीर, श्रद्धा मोरे. वयोगट 50 वर्षावरील पुरुष ः- लक्ष्मण यादव (कराड), मारुती चाळके (मलकापूर), जयवंत बाबर (तांबवे).