निर्ढावलेल्या नेत्यांच्या घरात बाजार समितीची सत्ता देवू नका : आ. पृथ्वीराज चव्हाणांची टीका
रयत पॅनेलचा तांबवे- सुपने जिल्हा परिषद गट कार्यकर्ता मेळावा

कराड | मी कधीही सहकारी संस्था निवडणूकीत भाग घेत नाही. परंतु काही स्वार्थी, धनदांडगे लोक यामध्ये उतरले आहेत. स्वर्गीय विलास काकांनी ही संस्था सक्षम चाललेली आहे, ही आर्थिक संस्था विरोधक गिळंकृत करु पाहत आहेत. यशवंतराव चव्हाणांनी सत्तेचे विकेंद्रीकरण केले. परंतु इथे ते दिसत नाही, तेव्हा निर्ढावलेल्या नेत्यांच्या घरात सत्ता देवू नका. याच्यात माझा भाऊ, माझाच मुलगा चेअरमन, व्हाईस चेअरमन तरी मलाच द्या हे चालू आहे, तेव्हा तुम्ही निर्णय प्रतिपादन माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
वसंतगड (ता.कराड) येथे लोकनेते विलासराव पाटील उंडाळकर रयत पॅनेलचा तांबवे- सुपने जिल्हा परिषद गट कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सभापती आर. वाय. नलवडे हे होते. काँग्रेस प्रदेश सरचिटणीस अँड. उदयसिंह पाटील, कराड दक्षिणचे अध्यक्ष मनोहर शिंदे, अजित पाटील- चिखलीकर, सज्जन यादव, रयत कारखाना संचालक शिवाजी गायकवाड, बाजार समिती माजी सभापती विजय कदम, अशोक पाटील- पोतलेकर, सरपंच तुकाराम डुबल, प्रकाश पाटील, पैलवान सचिन मोहिते, खरेदी विक्री संघाचे संचालक हणमंतराव चव्हाण, जगदिश पाटील, अशोकराज उद्योग समूहाचे शरद चव्हाण, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रदिप पाटील यांची होती.
अँड. उदयसिंह पाटील म्हणाले, बाजार समितीचे जडणघडण करण्यामध्ये काकांचं योगदान मोठे आहे.त्यांनी समाज कारण करताना सर्व सामान्य लोकांच्या विचार केला. सरंजामशाही ला विरोध केला.सतेच विकेंद्रीकरण केले. आज विरोधकांना सत्ता केंद्रीत करून सक्षम चाललेली संस्था गिळंकृत करू पाहत आहे. माणसांचं मत पैशाने विकत घेत आहेत.सत्तेसाठी खालच्या पातळीवर विरोध जात आहेत. या मेळाव्याचे प्रास्ताविक प्रदिप पाटील यांनी केले. सूत्रसंचलन उपसरपंच विश्वासराव कणसे यांनी केले. आभार लक्ष्मण देसाई यांनी मानले.
कराड उत्तर व दक्षिणची टोळी संस्था लाटण्यासाठी एकत्र : पृथ्वीराज चव्हाण
विरोधक पैसाचा वापर सत्ता घेण्यासाठी करत आहेत. उत्तर व दक्षिणची टोळी एकत्र येऊन ही संस्था लाटण्याचा पर्यंत करत आहे. त्यांना योग्य जागा दाखवा, ही संस्था शेतकऱ्यांच्या हितासाठी चालली पाहिजे. आपले उमेदवार सर्वसामान्य कुटुंबातील आहेत. चाळीस वर्षे ही संस्था कांकानी चांगली चालवली आहे.ती उदयसिंह पाटील येथून पुढे ही सक्षम पणे चालवतील. विरोधकांच्या अमिषाला भुलथापांना बळी पडू नका, असे आवाहन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.