ताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रराज्यसातारा

हेळगावला आरक्षणामुळे खेळखंडोबा : दोन दशके झाले पोलीस पाटील मिळेना

मसूर प्रतिनिधी | गजानन गिरी

हेळगावला तब्बल वीस वर्षापासून पोलीस पाटीलच नाही. पोलीस पाटलासासाठीचे आरक्षण प्रवर्ग व्यक्तीच नाही. विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांची आवश्यक दाखल्यासाठी अन्यत्र पायपीट सुरू आहे. कायदा व सुव्यवस्थेसाठी पोलीस यंत्रणेलाही कामकाजासाठी अडचणीचे ठरत आहे.आरक्षण बदलण्याची ग्रामस्थांची मागणी आहे.

कराड तालुक्यातील उत्तरेकडील हेळगाव हे एक राजकीय दृष्ट्या संवेदनशील व महत्त्वपूर्ण गाव. मसूर जिल्हा परिषद गटात गावाची भूमिका नेहमीच निर्णयाक. मात्र गेल्या वीस वर्षापासून या गावातील पोलीसपाटील पद रिक्त आहे. आवश्यक दाखल्यांसाठी ग्रामस्थासह विद्यार्थ्यांची अन्यत्र पायपीट सुरू आहे. आरक्षण सोडतीत मिळालेल्या आरक्षणानुसार या प्रवर्गातील व्यक्ती गावातच नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. यामध्ये विद्यार्थ्यासह ग्रामस्थांना धावाधाव करीत वेळ खर्ची घालून आर्थिक भुर्दंड, मनस्ताप सहन करावा लागत आहे. कायदा सुव्यवस्थेसाठी च्या कामकाजासाठी पोलीस यंत्रणेलाही पोलीस पाटलांचे पद महत्त्वपूर्ण ठरते. मात्र पोलीस पाटलांचे पदच रिक्त असल्याने पोलीस यंत्रणेलाही अडचणीचे ठरत आहे.

दोन वेळा झालेल्या आरक्षण सोडतीत विशेष मागास प्रवर्ग आरक्षण सलग दोन वेळा पडले. त्या प्रवर्गातील एक व्यक्ती पात्र ठरत होती. मात्र लेखी परीक्षेत ती व्यक्ती उत्तीर्ण न झाल्याने पद दोन्ही वेळा रिक्त राहीले. हेळगावचे पोलीस पाटील पद रिक्तच राहणार कायॽ अशी चर्चा ग्रामस्थांमध्ये आहे. अडचण लक्षात घेता आरक्षण बदलून तात्काळ पोलीस पाटील पद भरावे अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker