निवडणूक : कराड बाजार समितीसाठी आज 16 अर्ज दाखल
कराड प्रतिनिधी | विशाल वामनराव पाटील
कराड शेती उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज 16 जणांनी अर्ज दाखल केले. बाजार समितीसाठी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आता सोमवारी (दि.3) रोजी असणार आहे. काॅंग्रेसच्या काका- बाबा गटाच्या इच्छुक उमेदवारांसह डाॅ. अतुल भोसले यांच्याही समर्थकांनी आज अर्ज दाखल केले. आजपर्यंत एकूण 24 अर्ज दाखल झाले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी संदिप जाधव यांनी दिली.
कराड उत्पन्न शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी आज कृषी पत व बहुउद्देशीय मतदार संघातून ः- धनाजी दादासो थोरात, राहूल अमृतराव पवार, विजयकुमार सुभाष कदम, दिपक (प्रकाश) आकाराम पाटील (सुपने), प्रमोद बाळासो कणसे, अशोक बाबुराव पाटील, दिलीपराव दाजी पाटील, महिला प्रवर्गातून ः- विजयमाला रामचंद्र मोहिते, रेखाताई दिलीप पवार, मागास प्रवर्गातून ः- सपंत लक्ष्मण कुंभार, फिरोज अल्ली इनामदार, ग्रामपंचायत मतदार संघ- सर्वसाधारण ः- तुकाराम निवृत्ती डुबल (म्होप्रे), आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक ः- शंकर दिनकर इंगवले, आनंदराव भिमराव मोहिते, व्यापारी आडते मतदार संघ ः- जगन्नाथ बळी लावंड, जयंतीलाल चतुरदास (मनुभाई) पटेल यांनी आज अर्ज दाखल केले.
कराड बाजार समितीच्या निवडणुकीसाठी आजपर्यंत एकूण 24 अर्ज दाखल झाले असून सोसायटीच्या सर्वसाधारण गटातून- 12, महिला प्रतिनिधी गटातून- 2, इतर मागास प्रर्गातून- 3, वि. जा. भ. ज – 1 ग्रामंपचायत मतदार संघातून (सर्वसाधारण)- 1, अनुसूचित जाती- जमाती प्रवर्गातून- 1, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून- 2, व्यापारी आडते मतदार संघातून – 2 अर्ज दाखल झाले आहेत. काॅंग्रेसच्या काका- बाबा गटाकडून अर्ज दाखल करण्यासाठी युवानेते इंद्रजित चव्हाण, कराड दक्षिण अध्यक्ष मनोहर शिंदे, खरेदी विक्री संघाचे माजी सभापती हणमंतराव चव्हाण, रयत कारखान्याचे संचालक प्रदिप पाटील, कोयना बॅंकेचे संचालक अविनाश पवार, प्रा. धनाजी काटकर, वसंतराव इंगवले यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
सोमवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा व एकच दिवस
आज अर्ज दाखल करण्यासाठी काका- बाबा गटाकडून मोठ्या प्रमाणावर गर्दी करण्यात आली होती. आता डाॅ. अतुल भोसले व राष्ट्रवादीचे माजी सहकार मंत्री, कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील यांच्या गटातून काही अर्ज दाखल झाले आहेत. परंतु सोमवारी शेवट दिवस असल्याने अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी होणार आहे. कारण शनिवार व रविवार सुट्टी असल्याने अर्ज दाखल होणार नाहीत.