श्री संत ज्ञानेश्वर पालखी सोहळ्यात 66 इसमांवर कारवाई

सातारा | सातारा जिल्ह्यामध्ये श्री संत ज्ञानेश्वर पालखी सोहळा हा दि. 18/06/2023 ते 23/06/2023 रोजी दरम्यान पार पडला. श्री संत ज्ञानेश्वर पालखी वारीमध्ये येणाऱ्या वारीमधील भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास अगर पालखी सोहळ्यामध्ये उपद्रवी इसमांचेकडुन अनुचित प्रकार घडु नये. यासाठी स्वत: पोलीस अधिक्षक समीर शेख, तसेच अपर पोलीस अधिक्षक बापु बांगर यांनी लक्ष देवून बंदोबस्ताकरीता नेमले अधिकारी व अंमलदार तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री अरुण देवकर यांना गुन्हयांना प्रतिबंध करण्याबाबतच्या सुचना दिलेल्या होत्या.
सातारा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी त्यांचे अधिपत्याखाली स्वतः तसेच सहा. पोलीस निरीक्षक संतोष पवार, सहा. पोलीस निरीक्षक रविंद्र भोरे, सहा. पोलीस निरीक्षक आरती नांद्रेकर, पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, पोलीस उपनिरीक्षक मदन फाळके असे एकुण 7 वारकरी वेशातील पथके अंमलदारांसह तयार करुन त्यांना दिवस-रात्र कामकाजाचे नियोजन करण्यात आले होते.
स्थानिक गुन्हे शाखा, सातारा यांचेकडील तयार करण्यात आलेल्या पथकाने सातारा जिल्ह्यातील संपुर्ण वारी सोहळ्या दरम्यान काही उपद्रवी इसम हे वारीमध्ये चोरीच्या उद्देशाने पाकीट मारण्याच्या, बॅग चोरी अगर मौल्यवान वस्तु चोरण्याच्या इराद्याने संशयितरीत्या वावरताना तसेच वारीमध्ये बेशिस्तरीत्या वर्तन करताना मिळुन आलेल्या एकुण 66 इसमांचेवर प्रतिबंधक कारवाई केली. श्री संत ज्ञानेश्वर पालखी सोहळ्या दरम्यान गंभीर स्वरुपाचा अपराध करण्यापासुन प्रतिबंध केले, संपुर्ण पालखी सोहळा दरम्यान लोणंद मधील एक चैन चोरी खेरीज कोणताही अनुचित प्रकार न घडता पालखी सोहळा शांततेत व निर्विघ्नपणे पार पाडली. पोलीस अधिक्षक समीर शेख, तसेच अपर पोलीस अधिक्षक बापु बांगर यांनी बंदोबस्ताकरीता नेमले सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे अभिनंदन केले.