निवडणूक निकाल : पाणी पुरवठा संस्थेत पी. डी. पाटील पॅनल बहुमताने विजयी
कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री माननीय आमदार बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पाणी पुरवठा संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत आदरणीय पी. डी. पाटीलसाहेब पॅनल बहुमताने विजयी झाले. संस्थेच्या सर्वसाधारण गटातील 10 जागांसाठी निवडणूक झाली, त्यामध्ये एकहाती विजय मिळवला. तर उर्वरीत सर्व जागा बिनविरोध करण्यात पी. डी. पाटील पॅनल प्रमुखांना यश आले होते.
विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे ः- सर्वसाधारण मतदारसंघातील ः- उमेदवार पवार राजेंद्र ज्ञानदेव, पवार दिपक उत्तमराव, पवार सुरेश शामराव, माने राजेंद्र वसंतराव, घोरपडे मारूती नागेश, कदम दत्ताजीराव विठ्ठल, जाधव शिवाजी पांडुरंग, पाटील प्रकाश पांडुरंग, पाटील पार्थेश प्रकाश, शिंदे विलास धोंडीराम यांची भरघोस मतांनी विजयी झाले. तत्पूर्वी महिला राखीव मतदारसंघातून ः- सौ.सुशिला भीमराव पाटील, सौ. आशा अशोक पाटील, अनुसूचित जाती मतदारसंघातून ः- कांबळे मिलिंद दिनकर, इतर मागासवर्ग राखीव मतदारसंघातून ः- काशीद मंगेश पांडुरंग, वि. जा.भ.ज/ विशेष मागास प्रवर्गातून ः- येडगे भगवान गणपती यांची बिनविरोध निवड झाली आहे.
निवडणूक बिनविरोध करण्यासाटी अरुण पाटील, सुभाष पाटील, जयंत पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले. विजयानंतर सर्व उमेदवारांनी संस्थेचे श्रद्धास्थान, आदरणीय स्वर्गीय पी. डी. पाटीलसाहेब यांच्या निवासस्थानी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच येथील श्री ज्योतिर्लिंग मंदिरात जाऊन दर्शन घेतले. आमदार बाळासाहेब पाटील यांची कराड येथील संपर्क कार्यालयात सदिच्छा भेट घेतली. यावेळी आमदार बाळासाहेब पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी अरुण पाटील, सुभाष पाटील, जयंत पाटील, युवानेते जशराज पाटील, सागर पाटील, सौरभ पाटील, सुनिल पवार,शांताराम शिंदे, संजय पवार, गंगाधर जाधव, संदिप पाटील, वसंतराव शिंदे,राजेंद्र कांबळे, प्रकाश जाधव, सुभाष शिंदे, नितीन माने, लालासो पाटील, लक्ष्मण पवार,अहमद पठाण, लक्ष्मण शिंदे, जयवंत वेताळ, प्रकाश देसाई, प्रविण पाटील,बलराज पाटील, बंडा पाटील आदि मान्यवर सभासद व सेवकवर्ग उपस्थित होते.