येरवळेच्या सरपंचपदी रूपाली यादव, उपसरपंचपदी संजय यादव विजयी
कराड | येरवळे (ता. कराड) गावच्या सरपंचपदी अतुल भोसले गटाकडून रूपाली झुंजार यादव यांची तर उपसपंचपदी संजय तुकाराम यादव यांची निवड झाली. निवड समितीच्या बैठकीत गुप्तपध्दतीने मतदानात सहा-पाच संख्याबळावर सौ. यादव यांनी सरपंच पदाचा तर संजय यादव यांनी उपसपंच पदाचा बहुमान मिळवला.
यापुर्वीच्या सरपंच गितांजली यादव व उपसपंच अशोक जाधव यांनी पदाचा राजीनामा ठरल्याप्रमाणे नुकताच दिला. सरपंच- उपसपंच पदाच्या निवडीसाठी पुनश्च बैठक आज झाली. बैठकीत विरोधात दोन अर्ज दाखल झाल्याने गुप्त पध्दतीने मतदान झाले. सहा-पाच संख्याबळावर रूपाली यादव सरपंच ठरल्या. तर उपसरपंचपदी संजय यादव यांची निवड झाली. निवडीनंतर भोसले गटाच्या समर्थकांनी फटाक्याची अतिषबाजी करून गुलालाच्या उधळणीत जल्लोष केला. नवनिर्वाचित सरपंच उपसरपंच यांचे अभिनंदन केले.
मलकापूर मंडलाधिकारी पी. डी. पाटील यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. कृष्णेचे संचालक सयाजी यादव, सोसायटी अध्यक्ष भरत यादव, सुनिल यादव, तंटामुक्ती अध्यक्ष विकास यादव, झुंजार यादव, अॅड. आनंदराव यादव, आनंदराव कोळी, विजयसिंह वारूंग, राकेश यादव, शिवाजी यादव, डाॅ. आनंदराव लोकरे, माजी सरपंच नरेंद्र यादव, सेवा सोसायटी माजी अध्यक्ष शरद लोकरे यासह कार्यकर्ते याप्रसंगी उपस्थीत होते.