शेतकऱ्यांनो, पंचायत समितीत अर्ज करा : शेतीचे साहित्य अनुदानावर उपलब्ध
गटविकास अधिकारी मीना साळुंखे यांची माहिती

कराड | कराड पंचायत समितीकडून तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी जिल्हा परिषद सेस अतंर्गत कृषि विभागामार्फत 50 टक्के किंवा 40 टक्के अनुदानावर डीबीटी तत्वावर योजना राबविण्यात येत आहे. यामध्ये विविध कृषि औजारे व बियाणे वितरणासाठी दि. 31 जुलै 2023 रोजी पर्यंत इच्छुक पात्र लाभार्थ्यांनी अर्ज करावेत असे आवाहन कराड पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी मीना साळुंखे यांनी केले आहे.
वरील योजनेतून शेतकऱ्यांनी संकरित / सुधारित बियाणे, सायकल कोळपे, एचटीपी स्प्रेअर्स ट्रिपल पिस्टन मोटार / इंजिन सह, ताडपत्री, ६३/७५/९० एमएम एचडीपीई / पीव्हीसी पाईप, ३/५/७.५ एचपी विदयुत पंपसंच, ५ / ४ एचपी डिझेल इंजिन, कृषि यांत्रिकीकरण पल्टी नांगर, पेरणी यंत्र, ऊस पाचटकुट्टी यंत्र, खोडवा तासणी यंत्र), रोटाव्हेटर या योजना राबविण्यात येत असल्याची माहिती पंचायत समितीचे कृषि अधिकारी संतोष जाधव यांनी सांगितले.
योजनेसाठी लागणारी कागदपत्रे पुढीलप्रमाणे
१) नमुन्यातील अर्ज
२) ७/१२ व खाते उतारा (५ एकरचे आतील व ३ महिन्याच्या आतील)
३) आधार कार्ड साक्षांकित प्रत
४) बँक पासबुक साक्षांकित प्रत
५) रेशनिंग कार्ड साक्षांकित प्रत व लहान कुटुंबाचे घोषणापत्र
६) फोटो
७) पाईप व पंपसंचासाठी (विदयुत पंपसंच व डिझेल इंजिन) विहिरीची नोंद किंवा नदी पाणी परवाना
८) पंपसंचासाठी अर्जदाराचे नावे शेती विज लाईट बिल / विदयुत – कनेक्शन मंजूरीपत्र
९) ट्रॅक्टर चलित औजारासाठी ट्रॅक्टरची आरसीटीसी
१०). जातीचा दाखला साक्षांकित प्रत (अनुसूचित जाती लाभार्थीसाठी )
११) दिव्यांग असल्यास दिव्यांग सर्टिफिकिट साक्षांकित प्रत