आरोग्यताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रराज्यसातारा

कराडला जिल्ह्यातील पहिली यशस्वी मिनिमल इन्व्हेसिव्ह हृदय शस्त्रक्रिया

शारदा क्लिनीक- एरम हॉस्पीटलमध्ये 82 वर्षाच्या वृध्द महिलेवर शस्त्रक्रिया

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी
शारदा क्लिनीक एरम हॉस्पीटल, कराड येथे 82 वर्षाच्या वृध्द महिलेला चालताना दम लागत असल्याची तक्रार घेऊन रुग्ण हॉस्पीटलमध्ये दाखल झाल्या होत्या. त्यांची तपासणी केली असता हृदयाची एक झडप खराब झाली होती. ही झडप बदलण्याची गरज होती, मात्र त्याकरिता रुग्ण व त्याचे कुटुंबिय तयार नव्हते. या रुग्णाला पारंपारीक शस्त्रक्रिया न करता मिनिमल इन्व्हेसिव्ह शस्त्रक्रियेचा पर्याय सुचविण्याच आला. मिनिमल इन्व्हेसिव्ह ही हृदयाची शस्त्रक्रिया हा विविध प्रकारच्या हृदयरोगाशी सामना करण्यासाठी व्यापकपणे वापरला जाणारा सुरक्षित असा पर्याय आहे.

पारंपारीक शस्त्रक्रियेशी तुलना करता, कमीत कमी आक्रमक (किमान छेद) हृदय शस्त्रक्रिया कमी वेदना आणि रुग्णांना जलद दैनंदिन आयुष्य सुरुवात करण्यात मदत करते. रुग्णाचे वाढते वय पाहता मिनिमल इन्व्हेसिव्ह हा सुरक्षित पर्याय असल्याचे कराड येथील शारदा क्लिनीक एरम हॉस्पीटलचे कार्डिओव्हस्कुलर आणि थोरॅसिक सर्जन डॉ किशोर देवरे यांनी स्पष्ट केले. केवळ चार सेंटीमीटरचा छेद घेऊन ही शस्त्रक्रिया करण्यात आली. अवघ्या दोन दिवसातच या रुग्णाने स्वतःच्या पायावर उभा राहिल्याचे डॉ किशोर देवरे यांनी स्पष्ट केले. चौथ्या दिवशी रुग्णाला घरी सोडण्यात आले आणि आठवडाभरातच रुग्णाने दैनंदिन कामांना सुरुवात केली. रुग्णाची शारीरीक समस्येतून सुटका झाली असून श्वसनासंबंधीत तक्रारी दुर झाल्याने रुग्णाच्या कुटुंबियांनी देखील शारदा क्लिनीक एरम हॉस्पीटलचे आभार मानले.

पारंपरिक शस्त्रक्रियेच्या तुलनेने मिनिमल इन्व्हेसिव्ह कार्डिअॅक सर्जरीचे अनेक फायदे असतात. अशा शस्त्रक्रियेमध्ये चिरफाड करावी लागत नाहीत, वेदना देखील कमी होतात. रक्तस्त्राव किमान असल्याने बहुतांश रुग्णांना ब्लड ट्रान्सफ्युजनची देखील गरज भासत नाही आणि रक्तस्त्रावामुळे होणारे संसर्गही टाळता येतो. त्यामुळे संसर्गाला प्रतिकार करण्याची क्षमता कमी असलेल्या वृद्धांसाठी ही शस्त्रक्रिया आदर्श ठरतेय. कऱ्हाड येथील शारदा क्लिनीक एरम हॉस्पीटल येथे ही शस्त्रक्रिया केली जात असून हृदयासंबंधीत तक्रारी, गुंतागुंत असलेल्या रुग्णांनी याठिकाणी असलेल्या तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.असे आवाहन शारदा क्लीनिक एरम हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ चिन्मय एरम आणि डॉ किशोर देवरे यांनी केले आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker