नवीन एमआयडीसीत बार चालकास खंडणीची मागणी करून जबरी चोरी
सातारा | नवीन एमआयडीसी येथील एका बारमध्ये खंडणी मागून ती न दिल्याने गल्यातील पैसे घेवून गेल्याचा प्रकार घडला होता. तर एका आईस्क्रिम विक्रेत्यास दमदाटी करून त्याच्या गाड्याचे नुकसान केले होते. याबाबत बार चालक अनिल परशुराम मोरे (रा. बेबलेवाडी ता. जि. सातारा) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. या फिर्यादीवरून निकेत वसंत पाटणकर (वय- 30, रा. चंदननगर, सातारा), गणेश धनंजय ननावरे (वय- 25, चंदननगर, सातारा) या दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, नवीन एम.आय.डी.सी. सातारा येथील संगम बार चालकास मोक्याचे केसमधून बाहेर पडलेल्या सराईत आरोपीने त्याच्या अन्य साथीदारांना सोबत घेवून बार चालकास खंडणी मागितली. बार चालकाने खंडणी न दिल्याच्या कारणावरून बारमध्ये तोडफोड करून दोघां संशयितांनी जबरदस्तीने गल्यातील पैसे घेवून गेले. तसेच एका आईस्क्रिम विक्रेता देखील अशाच प्रकारे दमदाटी करून त्याचे आईस्क्रिम गाड्याचे नुकसान केले होते. त्याबाबत बार चालक अनिल मोरे यांनी सातारा शहर पोलीस ठाणेत तक्रार दिली होती.
सातारा येथील डी. बी पथकाने ठिकठिकाणी गोपनीय माहितीचे आधारे माहिती प्राप्त करून सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपी व त्याचे एका साथीदारास ताब्यात घेवून अटक केली. सदरची कारवाई पोलीस अधिक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधिक्षक बापू बांगर, पोलीस उपअधिक्षक किरणकुमार सुर्यवंशी, वरीष्ठ पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांचे मार्गदर्शनाखाली पो. उपनिरीक्षक सुधीर मोरे, पो. उपनिरीक्षक अनिल वाघमोडे, पो.हवा. सुजीत भोसले, पो.ना. अविनाश चव्हाण, पंकज ढाणे, विक्रम माने, पो. कॉ. संतोष कचरे, सागर गायकवाड, सुशांत कदम, गणेश घाडगे, विशाल धुमाळ यांनी सदरची कारवाई केली आहे.