पश्चिम महाराष्ट्रसातारा
कराड तालुका वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या अध्यक्षपदी गाैतम काटरे तर उपाध्यक्षपदी महादेव गिरी
कराड | कराड तालुका वृत्तपत्र विक्रेता संघटनेची बैठक यशवंतराव चव्हाण स्मृतीसदन (टाऊन हॉल) कराड येथे संपन्न झाली. या बैठकीत संघटनेच्या अध्यक्षपदी गाैतम काटरे तर उपाध्यक्षपदी मसूर येथील महादेव गिरी यांची निवड करण्यात आली.
सदर बैठकीत संघटनेची नवीन कार्यकारणी शनिवार दिनांक 12 ऑगस्ट 2023 रोजी करण्यात आली. यावेळी वृत्तपत्र विक्रेत्यांच्या अडचणी, कमिशन वाढ तसेच स्वतंत्र कल्याणकारी महामंडळाची चर्चा करण्यात आली.
सदर बैठकीत संघटनेत खजिनदार म्हणून धर्मेंद्र पाटील, सचिव जावेद काजी तर सहसचिव संजय माळी व अनिल पालकर यांची निवड करण्यात आली. तर मुख्य संघटनेची जबाबदारी गिरीश वैद्य यांच्याकडे सर्वानुमते सोपवण्यात आली. सदर बैठकीत वृत्तपत्र विक्रेते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर बैठक खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.