सैदापूर येथील जनरेटर चोरी 4 तासात उघड

सातारा | सैदापूर येथील जनरेटर चोरीचा गुन्हा 4 तासात उघड करुन 2 लाख 40 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. यामध्ये टेम्पो व दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून चोरीला गेलेला जनरेटरही ताब्यात घेतला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 7 रोजी पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, एक पांढरे रंगाचा टेम्पो (क्रमांक- एमएच- 07 पी- 1391) मधुन दोघेजण महानुभव मठाजवळ चोरीचा जनरेटर विक्री करण्याकरीता घेऊन येणार आहेत. या माहितीवरून तपास पथकाने टेम्पो व संशयित इसमांना महानुभाव मठ सातारा परिसरात सापळा लावून ताब्यात घेतले. यावेळी एक किर्लोस्कर कंपनीचा निळ्या रंगाचा जनरेटर व टेम्पो असा एकूण 2 लाख 40 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला.
सदर कारवाईमध्ये पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सहायक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, रविंद्र भोरे, पोउनि विश्वास शिंगाडे, पतंग पाटील, अमित पाटील पोलीस अंमलदार अतिश घाडगे, संतोष सपकाळ, संजय शिर्के, विजय कांबळे, शरद बेबले, लक्ष्मण जगधने, लैलेश फडतरे, प्रविण फडतरे, राकेश खांडके, अमित माने, अविनाश चव्हाण, विक्रम पिसाळ, गणेश कापरे, अमित सपकाळ, प्रमोद सावंत, स्वप्नील कुंभार, ओमकार यादव, मोहन पवार, अरुण पाटील, विशाल पवार, रोहित निकम, सचिन ससाणे, पृथ्वीराज जाधव, संकेत निकम, शिवाजी गुरव, यांनी सहभाग घेतला.