ग्रामपंचायत धुमशान : जावलीत 18 तर जिल्ह्यातील 6 तालुक्यात 31 ग्रामपंचायती बिनविरोध
महाबळेश्वर तालुक्यात 13 सरपंच बिनविरोध
सातारा प्रतिनिधी | वैभव बोडके
ग्रामपंचायतीसाठी उमेदवारीसाठी दाखल केलेले उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या अनेकांनी अर्ज मागे घेतले. अर्ज माघारीसाठी मोठी धांदल उडाल्याचे पहायला मिळाली. जिल्ह्यात सर्वाधिक बिनविरोध 18 ग्रामपंचायती जावली तालुक्यात झाल्या. तर कोरेगाव आणि पाटण तालुका 8, खटाव 5, वाई आणि कराड 4, माण तालुक्यात केवळ 1 ग्रामपंचायत बिनविरोध झाली.
कराड तालुक्यातील बिनविरोध ग्रामपंचायती ः- करंजोशी, सावरघर, यशवंतनगर , बाबरमाची- डिचोली. शेळकेवाडी (येवती) येथील सरपंच पदी प्रकाश तुकाराम शेळके यांची बिनविरोध निवड झाली. तर भोसलेवाडी, बानुगडेवाडी, गोसावेवाडी, हेळगाव, कांबोरवाडी, पिंपरी, शेळकेवाडी, येणपे, येवती, रेठरे बुद्रुक, सयापूर, टेंभू याठिकाणी निवडणूक रंगणार आहे.
पाटण तालुक्यातील बिनविरोध ग्रामपंचायती ः- गमेवाडी, गुंजाळी, नवसरवाडी, डावरी, उधवणे, गव्हाणवाडी, चौगुलेवाडी (सांगवड) व येराडवाडी. किल्ले मोरगिरी आणि जमदाडवाडी येथे सर्व सदस्य बिनविरोध निवडी झाल्या असून केवळ सरपंच पदासाठी निवडणूक लागली आहे.
कोरेगाव तालुक्यातील बिनविरोध ग्रामपंचायती ः- कण्हेरखेड, शिरढोण, बोबडेवाडी, बोरीव, चवणेश्वर, चोरगेवाडी. कोंबडवाडी, मुगाव. तर तडवळे संमत कोरेगाव, आसरे, चांदवडी, भाटमवाडी, वेलंग (शि.) या पाच ग्रामपंचायतींची निवडणूक लागली आहे.
खटाव तालुक्यातील बिनविरोध ग्रामपंचायती ः- कामथी तर्फ परळी, पोफळकरवाडी, उंबरमळे, पांगरखेल आणि फतरडवाडी (बुध).
माण तालुक्यात एकमेव सत्रेवाडी ग्रामपंचायत बिनविरोध झाली.
वाई तालुक्यातील बिनविरोध ग्रामपंचायती ः- कोंढावळे, वडोली, भिवडी पुनर्वसन, धोम पुनर्वसन
चांदवाडी पुनर्वसन ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या फरीदा अहमद शेख यांची बिनविरोध निवड झाली.
महाबळेश्वर तालुक्यात 13 ग्रामपंचायतीचे सरपंच पदाच्या निवडणूक बिनविरोध झाल्या.