बिनकामाच्या आमदाराला कराड उत्तरमधून हद्दपार करा : शरद कणसे
नहरवाडी येथे मनोजदादा घोरपडे यांच्या उपस्थितीत विकासकामांचे उद्घाटन

कोरेगाव | महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील प्रत्येक गावागावांमध्ये विकासाची गंगा वाहत आहे. जिल्ह्यातील प्रत्येक गावामध्ये विकास काम सुचवावे. त्यासाठी निधी दिला जात आहे. त्यासाठी मी गावोगावी फिरत आहे. कराड उत्तरच्या कोणत्याही गावांमध्ये गेलं तरी लोक ह्या आमदारांनी काहीच केलं नाही. त्यांना इथल्या जनतेशी काही देणं घेणं नाही. केवळ साखर कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वेठीस धरून आजपर्यंत त्यांनी कराड उत्तरचे नेतृत्व केलं. आमदाराचं या मतदार संघांमध्ये मतदान नाही किंवा ज्यांनी या मतदारसंघांमध्ये कसलाही विकास केला नाही. अशा या बिनकामाच्या आमदाराला कराड उत्तरमधून हद्दपार करा, असे आवाहन शिवसेना सातारा जिल्हा संपर्कप्रमुख शरद कणसे यांनी केले.
नहरवाडी (ता. कोरेगाव) येथे विविध विकास कामांच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी भाजपा कराड उत्तरचे नेते मनोजदादा घोरपडे, जिल्हाप्रमुख शिवसेना जयवंतराव शेलार, वासुदेव माने, संपतराव माने, भीमराव काका पाटील, संजय जाधव, विरोधी पक्ष नेते निलेश माने, उपजिल्हाप्रमुख शंकर वीर, तालुका प्रमुख तुषार निकम, तालुकाप्रमुख शिवाजी निकम, बदलापूर शहर प्रमुख सुरेश भोसले, तुषार चव्हाण, माजी नगराध्यक्ष सुखदेव माने, माजी नगरसेवक धनंजय पवार, मधुकर सावंत, रघुनाथ ढाणे, प्रवीण माने, राजू रोकडे, विकास माळी, अंकुश भोसले, बाळासाहेब गोरे, दिलीप संकपाळ, राजेंद्र बाबुराव माने, चेअरमन विक्रम सिंह, चेअरमन अशोक माने, शेखर माने- पाटील, बबलू शेख, नाशिक शेख, रणजीत माने, माजी चेअरमन विक्रम माने, पवन निकम, राजू नलवडे, सोमनाथ निकम, सतीश भोसले, महिपती यादव आदी उपस्थितीत होते.
यावेळी मनोजदादा घोरपडे म्हणाले, देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झाली. तरी सुद्धा आज कराड उत्तर मधील अनेक गावांना रस्ता, लाईट, पाणी या मूलभूत सुविधा मिळाल्या नाहीत. या विभागांमध्ये गेली पंधरा वर्षे आमदार असताना साधा रस्ता सुद्धा करता आला नाही. परंतु शिवसेना- भाजप सरकारच्या माध्यमातून नहरवडी येथील जाधव वस्ती सारख्या ठिकाणी चांगल्या प्रतीचा रस्ता तयार होऊन लोकांना ऊस वाहतूक व दळवळणाच्या सुविधा मिळतील.