चिखलीत आजी- माजी संघटनेच्यावतीने गावच्या स्वागत कमानीचा लोकार्पण
मसूर प्रतिनिधी गजानन गिरी
कराड तालुक्यातील चिखलीच्या आजी- माजी संघटनेच्यावतीने गावच्या लौकिकास साजेशी उभारलेल्या स्वागत कमानीचा लोकार्पण सोहळा पार पडला. संघटनेच्या 11 व्या वर्धापनदिनाच्या औचित्याने पार पडलेल्या कार्यक्रमात लष्करशाहीच अवतरली होती. कार्यक्रमाला देशप्रेमाची, भावनेची, प्रेरणेची, सन्मानतेची, अभिमानाची किनार लाभली होती. देशसेवेसाठी योगदान देणाऱ्या जवानांचा केलेला सन्मान प्रेरणा देणारा ठरला. मुख्यतः शहीद जवान महादेव निकम यांच्या वीरपत्नी उज्वला निकम व शहीद संदीप सावंत यांच्या वीरपत्नी स्मिता सावंत यांचा करण्यात आलेला सन्मान प्रेरणात्मक, भावनात्मक, ऊर्जा देणारा ठरला. निमित्ताने आजी-माजी सैनिक संघटनेची एकीही निदर्शनास आली. देशसेवेसाठी योगदान देणाऱ्या जवानांच्या प्रलंबित मागण्यांचे निवेदन शासन स्तरावर पोहोचवण्यासाठी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडे देण्यात आले.
सैनिक कल्याण विभागाचे उपसंचालक निवृत्त कर्नल राजेंद्र जाधव, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी भाऊसाहेब काळे, सैनिक फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष प्रशांत कदम, कॅप्टन इंद्रजीत जाधव, माई चॅरिटेबल ट्रस्टच्या संस्थापक अध्यक्षा संगीता साळुंखे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड, युवानेते कुलदीप क्षीरसागर, भाऊसाहेब चव्हाण, सरपंच प्रतिभा सावंत, उपसरपंच महेश पाटील, माजी जवान पांडुरंग माळी, गणपत गिरी, विलास घाडगे, प्रकाश पाटील, विजय सावंत, भीमराव सावंत, वसंत क्षीरसागर, अजित सावंत, शहाजी पवार, सचिन स्वामी, महादेव माळी, महादेव गावडे, विजय भादुगले, भरत सावंत, गोरख माळी, सूर्यकांत पाटील, संतोष माळी आदी उपस्थित होते.
संगीता साळुंखे यांनी देशरक्षणासाठी कार्यरत राहणाऱ्या जवानांचे कार्य प्रेरणादायी आहे. त्यांचे योगदान, बलिदान महत्वपूर्ण आहे. त्यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठीचा प्रयत्न करणार आहे. जवानांनी अडचणी मांडाव्यात. जरूर सहकार्य केले जाईल असे स्पष्ट केले. कुलदीप क्षीरसागर यांनी आजी- माजी संघटनेस सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. कॅप्टन इंद्रजीत जाधव, भाऊसाहेब चव्हाण, पोलीस निरीक्षक अजय गोरड यांनी मार्गदर्शन केले. कॅप्टन राजेंद्र जाधव यांनी जवानांच्या कुटुंबासाठी महिला सबलीकरणासह 60 विधवा बचत गट कार्यरत आहेत. जवानांच्या पत्नीने कर्तृत्व सिद्ध करावे असे सांगितले. राजकुमार सावंत, संदीप सावंत यांनी स्वागत केले. संतोष कणसे यांनी सूत्रसंचालन केले. राजाराम माळी यांनी आभार मानले.