मसूरच्या हद्दीतील लाॅजवर युवक- युवतींचे अश्लिल चाळे : पोलिस अनभिज्ञच

मसूर प्रतिनिधी | गजानन गिरी
मसूरच्या हद्दीत असणाऱ्या एका लॉजवर काही युवक व युवती शनिवारी दुपारच्या सुमारास असल्याची माहिती लोकांकडून समजल्यामुळे मोठा चर्चेचा विषय ठरला आहे. त्याठिकाणी युवक व युवती मिळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. महाविद्यालयीन युवक व युवती कॉलेजच्या नावाखाली लॉजवर येऊन अश्लील चाळे करत असल्याची अनेक दिवसापासून चर्चा सुरू आहे. नियमांना धाब्यावर बसवून लॉज मालक सर्रास अश्लील चाळे करण्यासाठी विद्यार्थी- विद्यार्थिनींना संधी उपलब्ध करून देत असल्याची चर्चा सुरू आहे. घटनेबाबत पोलीस स्टेशनला संपर्क साधला असता याबाबत कोणतीही माहिती मिळाली नसल्याचे सांगण्यात आले. एकंदरीत पोलीस अनभिन्नच आहेत.
मसूर हे विभागातील सुमारे 32 खेड्यांचे केंद्रस्थान आहे. सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक केंद्र गणले जाते. मसूर हद्दीत असणाऱ्या एका लॉजवर युवक-युवतींचे येणे-जाणे असून या लॉजवर गैरप्रकार होत असल्याचा संशय नागरिकांनी व्यक्त केला आहे. लॉजवर अनेकदा युवक- युवतींचा राबता असतो. त्यामुळेच त्या ठिकाणी गैरप्रकार होत असल्याची बाब शहरातील नागरिकांमध्ये चर्चीली जात आहे. शनिवारी एका महाविद्यालयातील एक युवती व युवक एका लॉजवर गेल्याची माहिती महाविद्यालयीन प्रशासनाला मिळाली. त्यानंतर प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी जाऊन तपासणी केली असता त्या ठिकाणी युवक व युवती मिळून आल्याची चर्चा सुरू आहे.
पोलिस यंत्रणेकडून नेहमी लॉजींग, हॉटेल आदींची माहिती घेत चौकशी केली जाते. जेणेकरून लॉजवर मुक्कामी असणाऱ्या संशयास्पद गुन्हेगारांचा व नियमबाह्य बाबींचा शोध घेतला जातो. घटनेमुळे पोलिसांनी वेळोवेळी लाॅजची तपासणी करून अशा घटनांना पायबंद घालण्याची गरज निर्माण झाली आहे. अन्यथा महाविद्यालयीन युवक युवतींचे जीवन अंधाकरमय होण्याची शक्यता आहे. नियमबाह्य सुरू असलेल्या कारभाराबाबत पोलिसांनी दखल घेणे गरजेचे आहे. तसेच संबधित अशा प्रकारे गैरप्रकार चालणाऱ्या लाॅजवर कडक कारवाई करण्याची मागणीही आता लोकांच्यातून जोर धरू लागली आहे.