ताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रराज्यसातारा

कराड लायन्स क्लबसह नक्षत्रच्या पदाधिकार्‍यांचे पदग्रहण

कराड । लायन्स क्लब कराड, लायन्स क्लब कराड नक्षत्रचा पदग्रहण सोहळा अतिशय उत्साहात बहुसंख्य लायन सदस्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी दोन्ही क्लबचे सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते. त्याचबरोबर लायन्स क्लब कराड सिटी, लायन्स क्लब मसूर चे बहुसंख्य सदस्यांची उपस्थिती होती. पद प्रधान अधिकारी व गायडींग पीडीजी पीएमजेएफ लायन जगदीश पुरोहित, रिजन चेअरमन बाळासाहेब शिरकांडे, एलसीआयएफचे डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर डॉ. महेश खुस्पे, ऍक्टिव्हिटी चेअरमन नरेंद्र रोकडे, झोन चेअरमन सुशांत व्हावळ यांनी विद्यमान नूतन पदाधिकार्‍यांना शपथ दिली.

लायन विराग जांभळे, लायन सतीश मोरे, लायन जितेंद्र ओसवाल यांनी लायन्स क्लब कराडचे अध्यक्ष, सेक्रेटरी व खजिनदार अशी शपथ घेतली. तसेच लायन डॉक्टर अनघा राजगुरू, लायन जयश्री साने तसेच लायन ज्योती शहा यांनी लायन्स क्लब कराड नक्षत्रचे अध्यक्ष सेक्रेटरी व खजिनदार अशी शपथ घेतली. अतिशय थाटामाटात आगळ्या वेगळ्या या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे लायन्स कुटुंबातील चार क्लबचे पदाधिकारी उपस्थित होते.

तसेच लायन सनी रामुगडे, लायन डॉ. रमेश लोखंडे, लायन दिलीप पाटील, लायन संदीप कोलते, लायन मंजिरी खुस्पे, लायन मीनाक्षी कोलते, लायन जितेंद्र निकम, लायन अनिल कदम, लायन दिनकर पवार उपस्थित होते. माजी विधानपरिषद सभापती यांचे विश्वासू व प्रांतपाल एमजेएफला भोजराज नाईक निंबाळकर यांनी फलटण येथून दोन्ही क्लबच्या नूतन पदाधिकार्‍यांना ऑनलाईन शुभेच्छा दिल्या. त्याचे थेट प्रसारण या वेळेस करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश शहा व गौरी चव्हाण यांनी केले. आभार नवनिर्वाचित सचिव सतीश मोरे यांनी मानले.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker