चक्क मैत्रिणीला दूर करण्यासाठी सोशल मिडियावर महापुरुषांचा अवमान : सातारा पोलिसांकडून एकाला अटक
सातारा | 15 ऑगस्ट रोजी महापुरुषांची आणि भारत मातेची बदनामी केल्याप्रकरणी साताऱ्यात तेड आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सातारा पोलिसांनी आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित करणाऱ्या मुख्य आरोपीस पंधरा दिवसांमध्ये तांत्रिक माहितीच्या आधारे छडा लावून अटक केली आहे. इंस्टाग्राम अकाउंट वरून मैत्रीण सोबत चॅटिंग करीत होता. त्याची इंस्टाग्रामवरील मैत्रीण ही अल्पवयीन होती, याचा राग मनात धरून आरोपीने अल्पवयीन युवकाचे अकाउंट आयडी घेऊन त्याच्या इन्स्टाग्रामवर महापुरुषांची बदनामी करणारे मेसेज पोस्ट केले. जेणेकरून त्याची बदनामी व्हावी आणि त्या शिक्षा मिळावी व तो मैत्रिणीपासून दूर व्हावा या हेतूने त्याने पोस्ट केली होती. मात्र, सातारा पोलिसांनी 15 दिवसांत तांत्रिक माहितीच्या आधारे मुख्य आरोपीला अटक केली.
एका इसमाचे इन्स्टाग्रामचे खाते nobixx_70 या खात्यावर महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह संदेश (Post) प्रसारीत करुन जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी अज्ञातांवर गुन्हा नोंद करण्यात आला होता. सदरचा आक्षेपार्ह संदेश (Post) प्रसारमाध्यमांचेवर प्रसारीत झाल्यानंतर नागरीकांच्या भावना दुखावल्या होत्या. तसेच नमुद प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेवून स्वतंत्र तपास पथके तयार करण्यात आली होती. तपासपथकाने इन्स्टाग्रामचे खाते nobixx_70 बाबत तांत्रिक माहिती प्राप्त करुन त्याचे सविस्तर विश्लेषन करण्यात आले. तांत्रिक माहितीच्या विश्लेषनामध्ये एका इसमाने वापरले असल्याची माहिती प्राप्त झाल्याने नमुद इसमास ताब्यात घेवून त्याचेकडे गुन्ह्याचे अनुशंगाने विचारपूस केली असता नमुद आरोपीने सदरचे आक्षेपार्ह संदेश (Post) प्रसारमाध्यमांचेवर प्रसारीत केले असल्याची कबुली दिली.
पोलीस अधीक्षक समीर शेख व अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी सातारा उपविभाग सातारा किरणकुमार सूर्यवंशी, पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सहायक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, रविंद्र भोरे, पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील, विश्वास शिंगाडे, अमित पाटील, महेश शेटे, पोलीस अंमलदार अजय जाधव, अमित झेंडे, विक्रम पिसाळ, धीरज महाडीक, मयुर देशमुख, वर्षा खोचे, उपविभागीय पोलीस अधिकारी सातारा विभाग कार्यालयाचे पोलीस अंमलदार संतोष देशमुख, चेतन बगाडे यांनी सदरची कारवाई केली आहे.