जयंत पाटील शिंदे गटाबाबत म्हणाले… : उध्दव ठाकरेंच्या आमदारांना परत फिरायचे वेध लागले
छगन भुजबळ यांच्यावर जोरदार हल्लाबोल.. बडवे आडवे
मुंबई | विठ्ठलाच्या सभोवताली बडवे आहेत, असे म्हणत आहेत. दोन वर्षे तुरूंगवास भोगून पुण्यात आले, तेव्हा पवार साहेबांनी फुले पगडी डोक्यावर ठेवली. महात्मा फुलेच्या विचाराची पगडी डोक्यावर ठेवली त्यावेळी बडवे आडवे नाही आले? त्या पगडीच्या खालून फुलेंचा विचार निघून गेला. ज्यांनी जोतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांची चेष्ठा केली, त्याच्या मांडीला मांडी लावून बसला. तेव्हा बडवे आडवे येत होते. तर उध्दव ठाकरे यांच्या सरकारमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने पहिली शपथ शिवतीर्थावर राष्ट्रवादीतून घेताना पहिल नाव छगन भुजबळ होतं. तेव्हा बडवे आडवे आले नाहीत, असा घणाघात राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी केला.
मुंबई येथे आयोजित राष्ट्रवादीच्या शरद पवार यांच्या उपस्थितीतील बैठकीत ते बोलत होते. पुढे जयंत पाटील म्हणाले, शिवसेनेच्या बाबतीत जे झालं ते राष्ट्रवादीच्या बाबतीत चालू आहे. राष्ट्रवादी नामशेष करण्याची भूमिका ठेवून कोणी पाऊले टाकत असेल, तर विचार करावा. शरद पवार साहेब संपूर्ण महाराष्ट्रात फिरायला लागले तर काय होईल यांची छोटीशी चूणुक कराड आणि साताऱ्यात पाहिली आहे. वय कितीही झालं तरी योध्द्यांचा भारतात दरारा आहे. माझी चूक काय मी शरद पवार साहेबांच्या शब्दाबाहेर जात नाही. संकट कितीही आली, तरी पवार साहेबांनी विचलित न होता संकटाचा सामना केला. 10 जून 1999 ला राष्ट्रवादीचा प्रवास सुरू झाला. अनेकांनी 25 वर्षात पक्ष मोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण आज काही दुर्देवाने बाजूला गेली. कोणाच्या अडचणी, प्रसंग आले, त्यात शरद पवार उभे राहिले.
जयंत पाटील यांचे भाषणातील काही मुद्दे
– मुंबई प्रदेशच्या नेमणुका जयंत पाटील करत नाहीत
– अमोल कोल्हे राष्ट्रवादीचे प्रचार प्रमुख
– बापाला कधीही विसरायचं नाही
– कानात सांगितले असत तरी प्रदेशाध्यक्ष पद सोडलं असत.
– आमच्या महाविकास आघाडीला रिक्षा म्हणून हिणवले जात होते. परंतु तेच सरकार चांगले चालले होते.
– भाजपाकडून विधानसभेत 105 आमदार असताना पक्षातील 5 निष्ठावंतांना मंत्रीपद,
– राष्ट्रवादीतून काहीजण गेले तर ९ जणांना मंत्रिपद
– दुसऱ्याची कबर खोदता- खोदता आपलीच कबर खोदत आहेत, असा भाजपाल टोला.
काळ्या दगडावरची पांढरी रेघ
उध्दव ठाकरे यांची साथ सोडून गेलेल्या 40 जणांची तक्रार काय होती. ती तक्रार तिथे येवून बसली असेल तर उध्दव ठाकरेंच्या आमदारांचे परत फिरायचे वेध लागले आहेत, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ असल्याचे जयंत पाटील म्हणाले. त्यामुळे आता राज्याच्या राजकारणात चांगलेच उलट सुलट डाव पडलीत.