JEE Mains Exam 2025 : ब्रिलियंटचा विद्यार्थी जिल्ह्यात प्रथम
राज्य व राष्ट्रीय पातळीवरील परीक्षेत उत्कृष्ट निकालाची परंपरा

कराड :- राज्य व राष्ट्रीय पातळीवरील परीक्षेत उत्कृष्ट निकालाची परंपरा असणाऱ्या सातारा जिल्ह्यातील ब्रिलियंट अकॅडमी जुनिअर कॉलेज ऑफ सायन्स कराडच्या विद्यार्थ्यांनी जेईई-मेन या भारतात अवघड समजल्या जाणाऱ्या परीक्षेत दैदिप्यमान यश संपादन केले आहे. तेजस चंद्रकांत दाभाडे हा विद्यार्थी ९९. ९३ पर्सेन्टाईल सह सातारा जिल्ह्यात प्रथम आला आहे. त्याने ब्रिलियंटच्या निकालाचे आतापर्यंतचे रेकॉर्ड ब्रेक करून ब्रिलियंटच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.
त्याचप्रमाणे आर्यन मोहन पाटील ९९:६३ पर्सेन्टाइल, सुमितराज चंद्रकांत यादव ९९:४३ पर्सेन्टाइल, विशाखा परशुराम आरेकर ९९.३९ पर्सेन्टाइल याप्रमाणे ४ विदयार्थ्यांनी ९९ पर्सेन्टाइल च्या पेक्षा जास्त यश प्राप्त केले आहेत, यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष, सचिव, कॉलेजच्या प्रिन्सिपल, शिक्षक यांच्या हस्ते करण्यात आला. आय आय टी जेईई परीक्षेत यश संपादित करवून देऊन जेईई ॲडव्हान्सड या परीक्षे साठी दरवर्षी विध्यार्थी पात्र करवून भारतातील आयआयटी, एनआयटी ट्रिपल आयआयटी, जिएफटीआय ई सारख्या सर्वोच्च कॉलेज मध्ये प्रवेश मिळवून देणारी कराड मधील हि एकमेव संस्था आहे.
उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखत ब्रिलियंटच्या विद्यार्थ्यांनी फक्त कराड येथील एकाच शाखेतून अतिशय घवघवीत यश संपादन केले आहे. तेजस चंद्रकांत दाभाडे ९९.९३ पर्सेन्टाइल, आर्यन मोहन पाटील ९९:६३ पर्सेन्टाइल, सुमितराज चंद्रकांत यादव ९९:४३ पर्सेन्टाइल, विशाखा परशुराम आरेकर ९९.३९ पर्सेन्टाइल, व्यंकटेश अरुण जाधव ९४.०० पर्सेन्टाइल, श्रवण बापूसो पाटील ९४.०० पर्सेन्टाइल, तनिष्का गणेश जाधव ९२.२९ पर्सेन्टाइल, पोळ अमोल श्रीकृष्ण ९१.०७ पर्सेन्टाइल, जयराज सुधाकर चव्हाण ८९.४३ पर्सेन्टाइल, तृप्ती संभाजी कुंभार ८८.५६ पर्सेन्टाइल, अंतरिक्ष चव्हाण ८८ पर्सेन्टाइल, अवधूत अनिल पाटील ८७.३८ पर्सेन्टाइल, थोरात तनिष्का भास्करराव ८६.५८ % पर्सेन्टाइल, विशाल विजय कुंभार ८४.३१ पर्सेन्टाइल याप्रमाणे घवघवीत यश संपादित केलेले असून हे सर्व विद्यार्थी जेईई ॲडव्हान्सड साठी पात्र आहेत तसेच एनआयटी, ट्रिपल आयआयटी, जिएफटीआय ई. सारख्या सर्वोच्च कॉलेज मध्ये प्रवेशासाठी पात्र आहेत.
दहावीची परीक्षा देणाऱ्या विदयार्थ्यांसाठी जेईई, नीट, एनडीए आर्किटेक्चर, डिफेन्स रिसर्च ई परीक्षांच्या तयारीसाठी एनसीईआरटी पॅटर्न नुसार 11 वी चे वर्ग एप्रिल पासून सुरू होत आहेत. तसेच आर्यन पब्लिक स्कुल अंतर्गत ६ वी ते १० वी फौंडेशन स्कुल सुरु असून, फौंडेशन स्कुल चे वर्ग १५ एप्रिल पासून सुरु होत आहेत, पालकांनी या संधीचा लाभ पाल्यांना मिळवून द्यावा असे आवाहन संचालक मंडळातर्फे करण्यात आले.