सह्याद्रि साखर कारखान्याचा 50 व्या ऊसतोडणी वाहतूक करारास प्रारंभ

मसूर प्रतिनिधी | गजानन गिरी
सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याच्या २०२३-२४ या ५० व्या हंगामासाठी, कारखान्याचे चेअरमन, राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री माननीय आमदार श्री बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ऊसतोडणी वाहतूक करारास प्रारंभ करण्यात आला आहे.
सन २०२३-२४ या हंगामासाठी कारखान्याकडे नोंदविलेल्या संपूर्ण ऊसाचे गळीत पूर्ण करण्याच्यादृष्टीने तोडणी वाहतूक यंत्रणेची तयारी करण्यात येत असून, बैलगाड्या, ट्रॅक्टरगाड्या, ट्रक, ट्रॅक्टर आणि ऊसतोडणी मशीन यांचेशी करार करण्यास प्रारंभ झाला आहे.
याप्रसंगी जी.व्ही.पिसाळ, व्ही.बी.चव्हाण, मोहनराव पाटील, जे.डी.घार्गे, एस.जी.चव्हाण, नितीन साळुंखे, व्ही.जे.शेलार, एम.के.साळुंखे, टी.आर.सुर्वे, मंगेश पाटील, उध्दवराव गायकवाड, महादेव गायकवाड, विश्वास थोरात, अशोक चव्हाण, महेंद्र खडके, राहूल जाधव, गजानन देशमुख, शंकर थोरात, रामचंद्र कदम, जयवंत घाडगे संतोष थोरात आदी उपस्थित होते.