Hello News 2026 Ganpati Arati Book
कृषीताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रराज्यसातारा

SGM कालेजचे प्राचार्य डाॅ. मोहन राजमाने यांना रोटरी अवॉर्ड 2023 प्रदान

कराड | येथील रयत शिक्षण संस्थेचे सद्गुरु गाडगे महाराज कॉलेजचे प्राचार्य डॉ. मोहन राजमाने यांना त्यांचे शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल रोटरी क्लब ऑफ कराड यांच्या वतीने कराड रोटरी अवॉर्ड 2022 – 23 देऊन गौरविण्यात आले. कृष्णा अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. सुरेश भोसले यांच्या हस्ते हा अवॉर्ड देण्यात आला.

या त्यांच्या सन्मानाबद्दल रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील, रयत शिक्षण संस्थेचे सचिव, प्राचार्य डॉ. विठ्ठल शिवणकर, रयत शिक्षण संस्थेचे सहसचिव प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे तसेच रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य अँड. रवींद्र पवार यांनी त्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचबरोबर महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. एस. ए. पाटील, प्रा.नेताजी सूर्यवंशी, प्रा. माधुरी कांबळे ज्युनिअर कॉलेजचे उपप्राचार्य प्रा. आर. वाय. पाटील, महाविद्यालयाचे रजिस्ट्रार आर. वाय. गायकवाड आणि महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर सेवक व विद्यार्थी यांनी त्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

एस. एच. पाटील इस्लामपूर

डाॅ. सुरेश भोसले म्हणाले, प्राचार्य डाॅ.मोहन राजमाने यांनी कराडमधील एसजीएम काॅलेजमध्ये भरपूर काम केले. ग्रामीण भागातील विद्यार्थी आज या विद्यालयात परिपूर्ण शिक्षण घेत आहे. ज्ञानदान करण्याचा त्याचा ध्यास अंत्यत वाखण्याजोगा आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close