कोटा अकॅडमीच्या विद्यार्थ्यांचे इंटरनॅशनल इंग्लिश ऑलम्पियाड परीक्षेत यश

कराड ः- आंतरराष्ट्रीय इंग्लिश ऑलम्पियाड परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून कराड मधील कोटा अकॅडमी व कोटा ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स कराडच्या इयत्ता 8 वी 9 वी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश संपादन केले.
सायन्स ऑलम्पियाड फाउंडेशन ही संस्था जनरल नॉलेज, सायन्स, गणित व इंग्लिश, कॅम्पुटर सायन्स या विषयांमध्ये शालेय विद्यार्थ्यांची आवड निर्माण व्हावी म्हणून गेली 25 वर्ष कार्यरत आहे. यासाठी ही संस्था इयत्ता पहिली ते बारावी पर्यंत विषयांची ऑलम्पियाड स्पर्धा आयोजित करते. या स्पर्धा परीक्षेत कराड येथील कोटा अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले आहे.
इंग्लिश ओलंपियाड परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून यामध्ये कोटा अकॅडमी व कोटा ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स इयत्ता नववी मधील विद्यार्थी कुमारी प्राजक्ता विठ्ठल तोरणे, कुमारी आर्या अशोक कदम, कुमारी नेहा ज्योतिराम जाधव, कुमार ओम संतोष थोरात, कु. ग्रंथाली शिवाजी जानकर, कुमार पार्थ प्रवीण जाधव, कुमार अल्फाज इलाही मुजावर, कु.सिद्धांत अभिजीत भंडारी. कु. आर्यन अभिजीत डाके या विद्यार्थ्यांना गोल्ड मेडल व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. तसेच कु. ओवेस कागदी, कु. शार्दुल सूर्यवंशी, कु. राजवर्धन मोहिते, कु. स्वाधीन पात्रा, कु. दर्शन भागवत, कु. अनघा पाटील,कु. मिताली चव्हाण यांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.
या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन कोटा अकॅडमी व कोटा ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स,कराडचे संस्थापक अध्यक्ष मा. डॉ. महेश खुस्पे व संचालिका सौ.मंजिरी खुस्पे, सहसंचालिका कुमारी मैथिली खुस्पे तसेच कोटा ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्सच्या प्राचार्या सौ. जयश्री पवार, उपप्राचार्या व मार्गदर्शिका सना संदे, गणेश थोरात तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.