शरद पवार आणि अजित पवार यांची भेट झालीच नाही : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
आमच्यात कोल्ड आणि हाॅटही वाॅर नाही

सातारा | शरद पवार आणि अजित पवार यांची पुण्यात भेट झाली हे मला माहित नाही. भेट झाल्याचे अधिकृतपणे कोणी सांगितलेही नाही. भेट झाली असेल, चर्चा झाली असेल तर मला चर्चा कशी कळणार, त्यावर मी काय बोलणार. मात्र, जर त्यांची भेट झाली असेल तर तुम्ही त्यांनाच विचारा. मात्र भेट झालीच नाही असंही सांगितलं जातय, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या दरे या गावी आले असून त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई उपस्थित होते. मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, आम्ही लोकांसाठी अनेक चांगले निर्णय घेतले आहेत. मोदी साहेबांच्या विकासाला साथ देण्यासाठी ते आमच्या सोबत आले तिघं ही आम्ही अतीशय चांगलं काम करतो आहोत. शासन आता लोकांच्या दारी जात आहे आणी आम्ही तिघं ही एकत्र काम करतोय सरकार मजबुत आहे सरकार पडणार नाही. जेवढे आरोप विरोधक करतील तेवढं सरकार मजबुत होईल. बच्चु कडु चांगला कार्यकर्ता आहे. त्यांच दिव्यांगाबाबत चांगलं काम करतायेत. राज्यभर दिव्यांगासाठी काम करत आहेत. त्यामुळं त्यांच्याबाबत विरोधकांना आणि कोणालाच काळजी करायचं कारण नाही.
आमच्यात कोल्ड आणि हाॅटही वाॅर नाही
राज्यात मी, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस अत्यंत चांगल्या पध्दतीने काम करत आहोत. आमच्यात कोणतेही कोल्ड आणि हाॅटही वाॅर नाही. आज रविवार आहे, कुठलचं वाॅर नाही. विरोधकांच्याकडून वावड्या उठवल्या जात आहेत, कारण त्यांच्या पाया खालची वाळु सरकली आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.