NDA, VIT -2025 परीक्षेत ब्रिलियंटच्या विद्यार्थ्यांचे यश

कराड :- राज्य व राष्ट्रीय पातळीवरील परीक्षेत उत्कृष्ट निकालाची परंपरा असणाऱ्या सातारा जिल्ह्यातील ब्रिलियंट अकॅडमी जुनिअर कॉलेज ऑफ सायन्स कराडचे विद्यार्थ्यांनी एनडीए या अवघड समजल्या जाणाऱ्या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. भारतातील सैन्यदलात अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण करत जयराज सुधाकर चव्हाण व पार्थ विनोद जामदार हे विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तसेच व्हीआयटी या परीक्षेत देखील येथील विद्यार्थ्यांनी दैदिप्यमान यश संपादन केले आहे.
आर्यन मोहन पाटील याने ऑल इंडिया रँक ८१५ निकालाचे आतापर्यंतचे रेकॉर्ड ब्रेक करून ब्रिलियंटच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. वेंकटेश अरुण जाधव ऑल इंडिया रँक ५२०९, जयराज सुधाकर चव्हाण ऑल इंडिया रँक ५३२३ त्याचप्रमाणे अवधूत अनिल पाटील, सई नितीन जगदाळे, अंतरिक्ष गणेश चव्हाण,श्रुष्टी शांताराम निकम,प्राजक्ता अरविंद शेवाळे, ज्ञानेश्वरी सुधाकर जाधव, अनन्या संदीप गायकवाड, अपूर्वा अधिकराव मोहिते,ज्ञानेश्वरी दीपक पवार, अनुष्का उदय लाड, मृणाल श्रीकांत सूर्यवंशी, सिफा जहांगीर शिकलगार याप्रमाणे विदयार्थ्यांनी यश प्राप्त केले आहे, हे विध्यार्थी व्हीआयटी या कॉलेज मध्ये वेल्लोर येथे कॅटेगरी १ अंतर्गत १० ते १२ लाख स्कॉलरशिपसह प्रवेशासाठी पात्र आहेत, सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष, सचिव, कॉलेजच्या प्रिन्सिपल, शिक्षक यांच्या हस्ते करण्यात आला. व्हीआयटी हे एनआयआरएफ रँक नुसार भारतातील ११ नंबर चे कॉलेज आहे भारतातील राष्ट्रीय पातळीवरील सर्वोच्च कॉलेज मध्ये प्रवेश मिळवून देणाऱ्या प्रवेश परीक्षांची तयारी कराड मधील ब्रिलियंट येथे केली जात आहे.उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखत ब्रिलियंट च्या विद्यार्थ्यांनी फक्त कराड येथील एकाच शाखेतून हे यश संपादन केले आहे.
दहावी ची परीक्षा देणाऱ्या विदयार्थ्यांसाठी जेईई, नीट, एनडीए आर्किटेक्चर, डिफेन्स रिसर्च ई परीक्षांच्या तयारीसाठी एनसीईआरटी पॅटर्न नुसार ११ वी चे वर्ग १ एप्रिल पासून सुरू झाले आहेत पुढील ३ री तुकडी १९ मे पासून सुरु होत आहे तसेच आर्यन पब्लिक स्कुल अंतर्गत ६ वी ते १० वी फौंडेशन स्कुल सुरु असून, फौंडेशन स्कुल चे वर्ग १ जून पासून सुरु होत आहेत, ६ वी ते १२ वी पर्यंतच्या सर्व विध्यार्थ्यांसाठी आर्टिफिशियल ईंटलिजन्सी, कॉम्पुटर लँगवेज, कोडींग, रोबोटिक्स ई अध्यापनासाठी टेक्नोस्कुल चे अध्यापन उपलब्ध केले आहे , मोफत हस्ताक्षरसुधार वर्गाचे आयोजन देखील शाळेमार्फत करण्यात आले आहे. या संधीचा लाभ पाल्यांना मिळवून द्यावा असे, आवाहन संचालक मंडळातर्फे करण्यात आले