ताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रराज्यशैक्षणिकसातारा

दक्षिण तांबवे शाळेच्या 27 विद्यार्थ्यांचा सन्मान

श्री स्वामी समर्थ कॉम्पुटर आणि किसन थोरात यांच्याकडून ट्रॉफी

तांबवे :- दक्षिण तांबवे (ता. कराड) येथील जिल्हा परिषद शाळेच्या 27 विद्यार्थ्यांनी मंथन परीक्षेत राज्यस्तरीय व जिल्हा स्तरावर यश संपादन केले. या यशाबद्दल उदयोजक संतोष पाटील आणि किसन थोरात यांच्याकडून विद्यार्थ्यांना ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले.

Z. P. Schools tambave

जिल्हा परिषद दक्षिण तांबवे शाळेच्या विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभ आणि स्नेहसंमेलन कार्यक्रम पार पडला. एनएमएमएस परिक्षेत ग्रामीण भगातून जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल श्रावणी वसंत बाबर हिचा सत्कार करण्यात आला. यशस्वी विद्यार्थ्यांना श्री स्वामी समर्थ कॅम्पुटर साकुर्डी यांनी सन्मानित केल्याबद्दल शाळेकडून त्यांचाही सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी किसन थोरात होते. यावेळी सरपंच जयश्री कबाडे, माजी सरपंच शोभाताई शिंदे, उपसरपंच अ‍ॅड. विजय पाटील, दिनकर बाबर, मुख्याध्यापक आबासाहेब साठे, मनिषा साठे, सीमा देसाई, सतीश सोनवणे, संभाजी शिंदे, उत्तम साठे, स्वाती काटवटे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिनेश मोगरे, सुजय पाटील, सुरेश शेळके, अर्चना पाटील, शिल्पा चव्हाण, मनिषा देसाई व केंद्रातील शाळांचे शिक्षक आणि पालक बहुसंख्येने उपस्थित होते.

स्नेहसंमेलन कार्यक्रमात पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांनी कलाविष्कार सादर केला. लावणी, तारक मेहता का उलटा चष्मा आणि छत्रपती संभाजी महाराज याच्यावर आधारित गाण्याने उपस्थितांची मने जिंकली.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close