खेळताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रविदेशसातारा

अमेरिकेतील अल्ट्रामॅन स्पर्धेत कराडच्या 22 वर्षीय वेदांतचा सन्मान : जाणून घ्या स्पर्धेविषयी माहिती

हॅलो न्यूज | नुकत्याच अमेरिका येथील एरिझोना राज्यातील फिनिक्स येथे पार पडलेल्या अल्ट्रामॅन स्पर्धेत कराडच्या वेदांत अभय नांगरे (वय- 22) याने भाग घेऊन ही स्पर्धा यशस्वी पूर्ण केल्याने त्याला अल्ट्रामॅन म्हणून सन्मानित करण्यात आले. सात देशातील 21 स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेतला होता त्यापैकी 16 स्पर्धकांनी ही स्पर्धा यशस्वीपणे पूर्ण केली. यावेळी स्पर्धेत वेदांत हा एकटाच भारताचे प्रतिनिधित्व करत होता.

Shree Furniture Karad- Patan

या स्पर्धेत स्पर्धकाला सपोर्टसाठी त्याच्या पुढे अथवा मागे कार सहित क्रु मेंबरची गरज असते. जे आपल्या स्पर्धकाला योग्य कॅलारीचे खाणे देणे, रस्ता दाखविणे याकरता मदत करीत असतात. यावेळी वेदांत बरोबर त्याची आई सौ. कल्याणी नांगरे व वडील श्री. अभय नांगरे हे क्रु मेंबर्स होते. याखेरीज अमेरिकेतील हवाई स्पर्धेचा अनेक वर्षाचा अनुभव असलेले बिली रिकार्ड्स हे होते. त्यांचे विशेष सहाय्य वेदांतला ही रेस पूर्ण करण्यासाठी झाले. या अगोदर वेदांतने जुलै 2022 मध्ये आयर्नमॅन ही स्पर्धा स्वित्झर्लंड येथे यशस्वी पूर्ण केली आहे. अल्ट्रामॅन स्पर्धा अतिशय कठीण अशी समजली जाते. जिद्द, चिकाटी, नियोजन, परिश्रम, त्याग, योग्य गुरूंचे मार्गदर्शन तसेच इच्छाशक्तीचे जोरावर वेदांत या स्पर्धेमध्ये यश मिळवू शकला.

अल्ट्रामॅन म्हणून सन्मानित झाल्यावर खासदार श्रीनिवास पाटील, सारंग पाटील यांनी वेदांतचे फोन वरून अभिनंदन केले. तसेच अनेक भारतातील मित्र, नातेवाईक तसेच अमेरिकेतील अनेक भारतीयांनी वेदांतचे विशेष कौतुक केले.
अमेरिकेतील फिनिक्स मराठी मंडळाने त्याची विशेष मुलाखत घेवून त्याचा गौरव केला. भारतामधून अमेरिकेत येवून ही कठीण स्पर्धा यशस्वी केल्याने आम्हाला भारतीय म्हणून वेदांतचा खुप अभिमान आहे, अशा भावना येथे अनेकांनी व्यक्त केल्या.

अल्ट्रामॅन स्पर्धा कशी असते जाणून घ्या
अमेरिकेतील अल्ट्रामॅन स्पर्धेत तरुण भारतीय अल्ट्रामॅन बनण्याचा मान वेदांतला मिळाला आहे. ट्रायथलॉन स्पर्धा तीन दिवसांची खडतर होती. या स्पर्धेमध्ये पहिल्या दिवशी 10 किलोमीटर पोहणे व 150 किलोमीटर सायकलिंग करायचे असते. दुसऱ्या दिवशी 275 किलोमीटर सायकलिंग करायचे असते. तर तिसऱ्या दिवशी 84 किलोमीटर रनिंग करायचे असते. प्रत्येक दिवसाचे अंतर स्पर्धकाला 12 तासाच्या आत पूर्ण करायचे असते. वेदांतला हे अंतर पार करण्यासाठी तीन दिवसात एकूण 33 तास 46 मिनिट लागले. दहा डिग्री थंड तापमाना मधून सलग साडेचार तास त्याला पोहावे लागले. तसेच सायकलिंग व रनींगसाठी थंड वातावरणातून, वाऱ्यातून तसेच कठीण अशा चढ- उतारा वरून त्याला अंतर पूर्ण करावे लागले.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker