कराडच्या DB पथकाने सलग 06 दिवसात 06 गुन्हे उघडकीस आणत मारला षटकार

कराड | कराडच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने सलग 06 दिवसात 06 गुन्हे उघडकीस आणत षटकार मारला आहे. पोलीस उप निरीक्षक आर. एल. डांगे व डीबी पथकाने या कारवाईत चोरीचा मुद्देमाल हस्तगत करत 7 आरोपींना अटकही केली आहे. तर शहरातील भांडी दुकान फोडून चोरी करणाऱ्या दोन संशयितांना 69 हजारांच्या मुद्देमालासह ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी, कराड शहरात दि. 1 सप्टेंबर रोजी नवग्रह मंदीर परिसरातील विजय भांडी स्टोअर्सची पाठीमागील भिंत लोखंडी पारच्या सह्याने फोडुन दुकानातील देवाच्या पितळी धातुच्या मुर्ती व पितळी कळस असा एकुण 69,000 रूपयांचा मुद्देमाल चोरीस गेला होता. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उप निरीक्षक आर. एल. डांगे करीत असताना दोन संशयित हे पितळी धातुच्या मुर्ती व पितळी कळस विक्रीसाठी कराड शहरात कृष्णा सर्कल येथे येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्या अनुषंगाने सापळा रचून अशोक नंदाप्पा बिराजदार व निखिल सुरेश सोनवणे (दोघेही रा. मुजावर कॉलनी, ता. कराड) यांना ताब्यात घेवून त्यांचे जवळ असले पिशवी तपासली असता पितळी मुर्ती, पितळी कळस मिळुन आला.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक बापू बागंर, उपविभागीय पोलीस अधिकारी कराड अमोल ठाकुर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उप निरीक्षक डांगे, सफाै रघुवीर देसाई, सफाै संजय देवकुळे, पोलीस हवा. शशि काळे, पोलीस नाईक संतोष पाडळे, कुलदिप कोळी, पो.शि. महेश शिंदे, आनंदा जाधव, अमोल देशमुख, मुकेश मोरे, दिग्विजय सांडगे, सोनाली पिसाळ यांनी केलेली आहे.