उद्या कोल्हापूर बंद : मुस्लिम तरूणाच्या आक्षेपार्ह स्टेटसवरून राडा
कोल्हापूर | आज शिवराज्यभिषेक दिना दिवशी (दि. 6) कोल्हापूरात मुस्लिम तरूणाने आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्याच्या कारणावरून राडा झाला आहे. शहरातील दसरा चाैकात दगडफेक करण्यात आली आहे. पोलिसांनी लाठीमार करून कार्यकर्त्यांना हटवण्यास सुरूवात केली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर हिदुत्वादी संघटनानी कोल्हापूर शहर उद्या बंद ठेवण्याची हाक दिली आहे.
मुस्लिम तरूणाने ठेवलेल्या स्टेटसवरून जातीय तेढ निर्माण झाला आहे. या प्रकारामुळे हिदुत्वादी संघटना आक्रमक झाल्या असून लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याच्या परिसरात लोकांची मोठी गर्दी आहे. या सर्व प्रकारामुळे कोल्हापूर शहरात तणाव निर्माण झाला आहे.
तरूणांनी ‘बाप तो बाप’ अशा आशयाचे आैरंगजेब आणि अफझलखान यांचे स्टेटस ठेवले होते. या स्टेटसवरून हिदुत्वादी कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. या सर्व प्रकारावरून मोठा बंदोबस्त शहरात तैनात करण्यात आला. संबधित मुस्लिम तरूणावर कारवाई करण्याची मागणी हिदू तरूणांनी केली आहे.