ताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रराजकियराज्यसातारा

कोयना जलविद्युत प्रकल्प : पुनर्वसित गावांना नागरी सुविधांसाठी 03 कोटी 36 लाखांचा निधी

पाटण | कोयनानगर येथील कोयना जलविद्युत प्रकल्पांतर्गत या विभागातील अनेक गावांचे पुनर्वसन झाले असून पुनर्वसन झालेल्या गावठाणांमध्ये नागरी सुविधा पुरविण्याच्या कामांना निधी मजूर झाला आहे. पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे सातत्याचे पाठपुराव्याने पाटण तालुक्यातील कोयना जलविद्युत प्रकल्पांतर्गत पुनर्वसित गावठाण असलेल्या आरल, चाफोली, करंजवडे शिवंदेश्वर, नहिंबे- चाफोली, वाजेगावं बी, मारुल व इतर पुनर्वसित गावठाणातील 16 नागरी सुविधांचे 03 कोटी 36 लाख 42 हजार एवढा निधी मंजूर झाला आहे. याबाबत शासन निर्णय राज्य शासनाचे महसूल व वन विभागाने शासन निर्णय पारित केला असल्याची माहिती पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे कार्यालयाचेवतीने प्रसिध्दीपत्रकांत दिली आहे.

प्रसिध्दी पत्रकांत पुढे म्हंटले आहे की, कोयनानगर येथील कोयना धरणांतर्गत या विभागातील अनेक गावे पुर्णत: बाधित झाली असून या बाधित गावांचे पुर्नसनही करण्यात आले आहे. शासन निर्णय राज्य शासनाचे महसूल व वन विभागाने शासन निर्णय पारित केला आहे. यामध्ये आरल चाफोली ग्रामपंचायत 30 लाख, करंजवडे शिवंदेश्वर अंतर्गत रस्ते बांधकाम व साकव 76 लाख 31 हजार, नहिंबे चाफोली पोहोच रस्ता व गटर बांधकाम 28 लाख 16 हजार,वाजेगाव बी मारुल स्मशानभूमी शेड 7 लाख 42 हजार, देशमुखवाडी हुंबरळी ग्रामपंचायत कार्यालय 30 लाख 22 हजार,गोजेगाव गोषटवाडी राममळा बस थांबा बांधकाम 4 लाख 90 हजार, कुसवडे झाकडे बस थांबा बांधकाम 4 लाख 87 लाख, किसरुळे मेंढेघर अंतर्गत रस्ता व गटर बांधकाम 16 लाख 81 हजार, चिरंबे काढोली बस थांबा बांधकाम 4 लाख 91 हजार, वाजेगाव बी मारुल बस थांबा बांधकाम 4 लाख 85 हजार, नहिंबे मेंढेघर अंतर्गत रस्ता व गटर बांधकाम 28 लाख 92 हजार,मानाईनगर ग्रामपंचायत कार्यालय 30 लाख 22 हजार, आरल चाफोलली स्मशानभूमी शेड व पोहोच रस्ता 14 लाख, आरल चाफोली अंतर्गतरस्ता व गटर बांधकाम 30 लाख 51 हजार, आरल चाफोली शाळा 19 लाख 41 हजार, आरल चाफोली बस थांबा 4 लाख 91 हजार असा एकूण 16 गावांतील नागरी सुविधांचे कामासाठी 3 कोटी 46 लाख 42 हजार एवढा निधी मंजूर झाला आहे. दरम्यान मंजूर झालेल्या कामांची निविदा प्रक्रिया तातडीने करण्यात येऊन पावसाळा संपल्यानंतर या कामांना सुरुवात करण्यासाठी आवश्यक ती सर्व कार्यवाही करावी, अशा सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी अधिकारी यांना दिल्या असल्याचे शेवटी पत्रकात नमूद केले आहे.

अल्पसंख्याक विभागांतर्गत 03 कामांसाठी 75 लाखांचा निधी मंजूर.
पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी मतदारसंघातील अल्पसंख्याक बहुल ग्रामीण क्षेत्रात मुलभूत/पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी मरळी,विहे व सांगवड या गावांतील मुस्लिम समाजाचे ग्रामस्थांनी मागणी केलेल्या विकास कामांचे प्रस्ताव अल्पसंख्याक विकास विभागाकडे सादर करण्याचे निर्देश दिले होते.त्यानुसार अल्पसंख्यांक विभागाने मरळीयेथे मुस्लिम समाजाचे मशिदीसमोर सामाजिक सभागृह 30 लाख,विहे मुसिल्म समाजाचे मशिदीस संरक्षक भिंत 25 लाख व सांगवड येथील मुस्लिमवस्ती कब्रस्थान संरक्षक भिंत 20 लाख असा 75 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याचा शासन निर्णय पारित केला असून मुस्लिमवस्तीमधील ही कामे लवकरच मार्गी लागणार आहेत.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker