कृषीताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रराजकियराज्यसांगलीसातारा

विधानसभा निवडणुकांमुळे यंदाचा गळीत हंगाम लांबणीवर : डाॅ. सुरेश भोसले

यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्यांची 68 वी वार्षिक सर्वसाधारण सभा

कराड ः – साखर कारखाना चालवताना पुढच्या एका वर्षाचा विचार न करता पुढच्या पाच-दहा वर्षांमध्ये काय करायचा हा सुद्धा विचार नेहमी करावा लागेल. गेल्या वर्षाचे जर विचार केला तर सरकारचे धोरण बदलल्यामुळे विस्कळीतपणा आला. आज आमच्याकडे आत्ताच्या घडीला सुद्धा डिसेंबरमध्ये तयार केलेले इथेनॉल पडून आहे. मात्र, इथेनाॅल आणि साखरेला कायम महत्व राहणार आहे. साखर, इथेनाॅल, वीज यासह उपपदार्थांचे उत्पादन कारखान्यांनी घेतले पाहिजे. ऊसासारख स्थिर उत्पादन देणारा कोणताही व्यावसाय किंवा पीक नाही. त्यामुळे साखर कारखानदारीला नेहमी महत्त्व राहणार आहे, ही इंडस्ट्री कधीही खाली जाणार नाही. तसेच राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या तारखा अद्याप जाहीर झालेल्या नाहीत. त्यामुळे कारखान्यांचा गळीत हंगाम लांबणीवर पडणार असून नोव्हेंबरमध्ये सुरू होईल का?, याबाबतची चिंता यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डाॅ. सुरेश भोसले यांनी वार्षिक सभेत व्यक्त केली.

रेठरे बु येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या 68 वी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. या सभेला कृष्णा सहकारी बँकेचे चेअरमन डॉ. अतुल भोसले, सोनहिरा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आमदार मोहनराव कदम, माजी आमदार भगवानराव साळुंखे, कृष्णा कारखान्याचे उपाध्यक्ष जगदीश जगताप, संचालक लिंबाजी पाटील, दयानंद पाटील, धोंडिराम जाधव, निवासराव थोरात, संजय पाटील, बाबासो शिंदे, बाजीराव निकम, संभाजीराव पाटील, शिवाजी पाटील, सयाजी यादव, दत्तात्रय देसाई, जे. डी. मोरे, विलास भंडारे, सौ. जयश्री पाटील, सौ. इंदुमती जाखले, वसंतराव शिंदे, अविनाश खरात, श्रीरंग देसाई, दिपक पाटील, एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर सी. एन. देशपांडे, कार्यकारी संचालक महावीर घोडके, माजी संचालक दिलीपराव पाटील, ब्रिजराज मोहिते, पांडुरंग होनमाने, ब्रम्हानंद पाटील, राजारामबापू सहकारी बँकेचे संचालक संग्राम पाटील, माणिकराव पाटील, कृष्णा कृषी परिषदेचे अध्यक्ष गजेंद्र पाटील, केदार पाटील आदी उपस्थित होते.

अतुल भोसले म्हणाले, कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या 68 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने मला मनापासून सभासद म्हणून आनंद होतो. मागच्या गळीत हंगामाच्या निमित्ताने उत्कृष्ट कार्यक्षमता कृष्णा सहकारी साखर कारखान्याने दाखवली. चार नोव्हेंबरला आपला गळित हंगाम चालू झाला आणि 19 मार्चपर्यंत हंगाम चालला. 137 दिवसांमध्ये साडेतेरा लाख टन गाळप सरासरी 10 हजार मेट्रिक टन करून दाखवलं. आपण दीडशे दिवसाचा गळीत हंगाम अपेक्षित धरत होतो. पण दहा-बारा दिवस आपला कारखाना कमी चालला. पण कार्यक्षमतेच्या बाबतीमध्ये उत्कृष्ट कार्यक्षमता दाखवण्याचं काम हे कृष्णा सहकारी साखर कारखान्यांनी मागच्या गळीत हंगामामध्ये दाखवलं.

कृष्णाने एफआरपीपेक्षा 266 रूपये जादा दिले :- डाॅ. अतुल भोसले
मागच्या वेळेला केंद्र सरकारच्या धोरणानुसार आपली एफआरपी 2834 रुपये बसत होती. पण आपण 3100 रूपये दर दिला आणि 266 रुपये आपण टनाला जास्तीचा दर एफआरपीच्या पेक्षा जास्तीचा दर दिला. ऊसाला 3100 दर देण्याबरोबर मोफत साखर, घरपोच साखर देण्याचा खर्च देखील मोठ्या प्रमाणावर आपल्या कारखान्याला करावा लागत आहे. तो खर्च देखील हा कारखान्याच्या ताळेबंदावरच पडतो. त्यामुळे आपण अत्यंत काटकसरीचा कारभार केल्याशिवाय ही सगळी सिस्टीम आपल्याला राबवता येणे शक्य नसल्याचे डाॅ. अतुल भोसले यांनी सांगितले.

इंडियन ऑइल कंपनी कृष्णा कारखान्यात 120 कोटीची गुंतवणूक करणार
इंडियन ऑइल कंपनी कृष्णा कारखान्यात गुंतवणूक करू इच्छिते. आज आम्हाला देखील खूप मोठा अभिमान वाटतो, की भारतीय पातळीवर भारताच्या पातळीवर चालणारी राष्ट्रीयकृत कंपनी आपल्या सोबत भागीदारीस तयार आहे. देशातील मोठमोठ्या गव्हर्नमेंटच्या ज्या कंपन्या आहेत. त्यापैकी इंडियन ऑइल कंपनी आहे, ती इंडियन ऑइल कंपनी कृष्णा सहकारी साखर कारखान्यामध्ये बायो सीएनजींच्या प्रकल्पासाठी गुंतवणूक करू इच्छिते. त्याच्याबद्दलचं प्रेझेंटेशन सुरेश बाबांनी इंडियन ऑइल कंपनीने दिले. इंडिया कंपनी बरोबर चर्चा झाली की शेवटच्या टप्प्यामध्ये चर्चा आलेली आहे. कंपनीसोबत सुरेश बाबांची यशस्वी चर्चा झाली तर 120 कोटी रुपयांची गुंतवणूक ही कृष्णा सहकारी साखर कारखान्यामध्ये इंडियन ऑईल कंपनी करणार आहे. या गुतवणुंकीमुळे एक नवीन प्रकल्प उभा राहणार आहे. या प्रकल्पातून अनेकांच्या हाताला काम मिळणार असून आपल्या भागातील सुशिक्षित तरुणांना रोजगार मिळणार असल्याचेही डाॅ. अतुल भोसले यांनी सभेत सांगितले.

कृष्णा कृषी परिषदेचे सदस्य 3 महिन्यात नेमणार :- डाॅ. अतुल भोसले
आता कृष्णा कृषी परिषदेचे अजून काही सदस्य नेमायचे राहिलेले आहेत. पुढील तीन महिन्यानंतर ती सुद्धा प्रक्रिया आपण कोण- कोण कसं कसं वागते, हे बघून चालू करूया. आता लोक आहेत ते देखील आपल्याला आता नेमले पाहिजेत. त्याचा देखील विचार हा संचालक मंडळ आणि निश्चित स्वरूपी येणाऱ्या काळामध्ये करावा.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker