कराडमध्ये 2 एप्रिलला रंगणार कृष्णा मॅरेथॉनचा थरार
भाजपाचे लोकसभा प्रभारी डॉ. अतुल भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन

कराड । भारतीय जनता पार्टीचे लोकसभा प्रभारी डॉ. अतुल भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त रविवार दि. 2 एप्रिल रोजी कराड येथे भव्य कृष्णा मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘आरोग्यदायी हृदयासाठी धावा’ असा संदेश या मॅरेथॉनच्या माध्यमातून दिला जाणार आहे.
कराड येथील शिवाजी विद्यालय येथे आयोजित ही मॅरेथॉन 14 वर्ष वयोगटाखालील, तसेच 15 ते 20, 21 ते 30, 31 ते 40, 41 ते 50 आणि 51 वर्षावरील वयोगट अशा विविध गटांत होणार आहे. 5 कि.मी. स्पर्धेसाठी 300 रुपये प्रवेश फी, 10 कि.मी. स्पर्धेसाठी 400 रुपये प्रवेश फी व 21 कि.मी. स्पर्धेसाठी 500 रुपये प्रवेश फी आकारण्यात येणार असून, सहभागी स्पर्धकांना टायमिंग बिब, टी शर्ट, मेडल, नाष्टा, ई-प्रमाणपत्र यासह आरोग्यविषयक सपोर्ट दिला जाणार आहे. स्पर्धेत 10 कि.मी. विजयी होणाऱ्या प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकांना अनुक्रमे 3, 000 रु., 2, 000 रु. व 1, 000 रुपयांचे रोख बक्षीस; तर 21 कि.मी. स्पर्धेत विजयी होणाऱ्या प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकांना अनुक्रमे 5, 000 रु., 3, 000 रु. व 2, 000 रुपयांचे रोख बक्षीस देण्यात येणार आहे.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी https://bit.ly/krishnarun2023 या लिंकवर ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करावी अथवा सतीश चव्हाण (मोबा. 9766601677), ओंकार ढेरे (मोबा. 9075225653) किंवा प्रा. विशाल साळुंखे (मोबा. 9822654057) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.