Hello News 2026 Ganpati Arati Book
क्राइमपश्चिम महाराष्ट्रब्रेकिंगराज्यसातारा

जेवायला मटण नाही म्हणून ढाबा चालकास मारहाण

सातारा जिल्ह्यातील घटना

महाबळेश्वर । जेवणासाठी मटण दिले नाही, म्हणून साताऱ्यातील चार युवकांनी ढाबा चालकास बेदम मारहाण केल्याची घटना महाबळेश्वर परिसरातील निसर्ग ढाब्यावर घडली. याप्रकरणी चौघांवर महाबळेश्वर पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. महाबळेश्वरपासून 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या वाघेराची जाळी या बस थांब्यानजीक निसर्ग ढाब्यावर जेवण्यासाठी सातारा येथून चार युवक आले. रात्री 7 वाजण्याच्या सुमारास ढाबा चालकाकडे मटणाच्या जेवणाची ऑर्डर दिली. परंतु, ढाबा चालकाने त्यांना मटण नसल्याचे सांगितले. यामुळे या चार युवकांनी ढाबा चालकास बेदम मारहाण केली.

रोहन करवले, राहुल करवले, शुभम काटकर, महेश सावंत (सर्व रा. सातारा- होलार गल्ली) यांनी निसर्ग हॉटेलचे चालक संदेश लोहार यांच्याकडे जेवणासाठी मटणाची मागणी केली. मात्र, मटण नसल्याचे सांगत संदेश लोहार यांनी त्यांना आपण महाबळेश्वर येथून मटण आणून बनवून देतो, असे सांगितले. त्यानंतर दुचाकीवरून संदेश रमेश लोहार व त्याचा मावसभाऊ हे दोघे मटण आणण्यासाठी महाबळेश्वरकडे दुचाकीवरुन निघाले. त्यांच्या दुचाकीपुढे त्या युवकांचे वाहन होते. या युवकांनी रात्रीच्या अंधारातच आपले वाहन थांबवून संदेश रमेश लोहार व विवास सुतार या दोघांना बेदम मारहाण केली व अंधारातच ते युवक पसार झाले.

हॉटेल मालकाने ही माहिती महाबळेश्वर पोलिस ठाण्यात फोन करून कळवली. चौघा युवकांमधील एक जण ढाब्यावाल्याच्या ओळखीचा होता. त्याचा शोध घेऊन त्याला महाबळेश्वर पोलिस ठाण्यात हजर करून त्याच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरिक्षक संदीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक रऊफ इनामदार तपास करत आहेत.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close