ताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रराजकियराज्यविधानसभा 2024सातारा

लाडकी बहीण योजना कुणाच्या डोक्यातून आली – भाजप मंत्र्यांकडून खुलासा

डाॅ. अतुल भोसलेंच्या उपस्थितीत बांधकाम कामगार लाभार्थींना साहित्याचे वितरण

कराड ः- भाजपचे लोकसभा प्रभारी डॉ. अतुल भोसले यांच्या कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी बांधकाम कामगार लाभार्थींना साहित्य वितरण केले. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला असता विरोधकांवर जोरदार टीका केली. तसेच लाडकी बहीण योजना कशी आमंलात आली, योजना कुणाच्या डोक्यातून आली हे कामगार मंत्री डाॅ. सुरेश खाडे यांनी सांगितले.

कामगार मंत्री सुरेश खाडे म्हणाले, महायुतीनें राबवलेल्या योजनांमुळे विरोधकांच्या पोटात दुखत आहे. लाडकी बहीण योजनेला मुख्यमंत्र्यांचे नाव, अजित दादांनी फायनान्स केले असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या डोक्यातून आलेली ही योजना आहे. लाडकी बहीण योजना बंद होणार नसून विरोधकांकडून फुसका बार काढला जात आहे. राज्याच्या विकासात सर्वस्तरातील कामगारांचे मोठे योगदान आहे. या कामगारांच्या कल्याणासाठी आणि त्यांना बळकटी मिळवून देण्यासाठी महायुती शासन खंबीर आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची रक्कम दरमहा दीड हजारावरुन ३ हजार करण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

भाजपा कामगार मोर्चा कराड दक्षिणच्यावतीने शिंदेवाडी-विंग येथील समर्थ मल्टीपर्पज हॉलमध्ये भव्य बांधकाम कामगार संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमात ना. खाडे यांच्या हस्ते कराड दक्षिणमधील सुमारे २,४९२ लाभार्थी बांधकाम कामगारांना साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच महिलांना भांडी वाटप व बांधकाम कामगारांच्या मुलांना शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात आले.

डॉ. अतुल भोसले म्हणाले, सातारा जिल्ह्यात कराड तालुक्यामध्ये सर्वाधिक बांधकाम कामगारांची नोंद झालेली आहे. अधिकाधिक पात्र लाभार्थींना याचा लाभ मिळवून देण्यासाठी भाजपा कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत. बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी महायुती शासन प्रयत्नशील असून, शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आम्ही घरोघरी जाऊन लोकांना याबाबतची माहिती देत आहोत. तसेच त्यांच्यासाठी विशेष नोंदणी अभियान राबविले जात आहे.

यावेळी जिल्ह्याचे कामगार आयुक्त रेवणसिद्ध भिसले, कामगार आयुक्त नितीन पाटणकर, कृष्णा कारखान्याचे संचालक श्रीरंग देसाई, माजी नगराध्यक्षा सौ. रोहिणी शिंदे, डॉ. सारिका गावडे, सौ. शामबाला घोडके, समृद्धी जाधव, भाजपा कामगार मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष दादाभाऊ उमराणी, तालुकाध्यक्ष रुपेश देसाई, योगेश पाटील, सागर पाटील, विकास साळुंखे यांच्यासह बांधकाम कामगार महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.Dr. Atul Bhosle Karad workers meeting

विंग : भाजपा कामगार मोर्चाच्यावतीने आयोजित बांधकाम कामगार संमेलनात बोलताना कामगार मंत्री ना. डॉ. सुरेश खाडे. बाजूस डॉ. अतुल भोसले व अन्य मान्यवर.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker