वकिलांनी आपल्या व्यवसायांमध्ये समाजाभिमुखता जोपासावी : ॲड. उज्वल निकम
कोरेगाव न्यायालयात कोरेगाव बार असोसिएशनच्यावतीने कार्यक्रम
सातारा प्रतिनिधी। वैभव बोडके
वकिली व्यवसायमध्ये आलेल्या नवीन वकिलांनी कायद्याबरोबर इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळविणे गरजेचे आहे. वकिलांनी आपल्या व्यवसायामध्ये समाजाभिमुखता जोपासावी. तसेच वकिली व्यवसाय हा अव्याभिचारी निष्ठेने आचरणात आणावा, असे आवाहन निष्णात कायदे पंडित ॲड. उज्वल निकम यांनी केले. ॲड. उज्वल निकम यांच्या उपस्थितीत कोरेगाव न्यायालयात कोरेगाव बार असोसिएशन पदाधिकाऱ्यांनी आयोजित कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी कोरगाव न्यायालयाचे प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी ए. बी. पाटील, सह दिवाणी न्यायाधीश ए. ए. पाचारणे, सह दिवाणी न्यायाधीश सौ. यू. ए. भोसले, उच्च न्यायालय सहाय्यक सरकारी वकील ॲड. पंकज चव्हाण, सातारा जिल्हा वकील संघटना अध्यक्ष विजयराव देशमुख, तालुका वकील संघटनेचे अध्यक्ष ऍडव्होकेट पी. सी. भोसले, उपाध्यक्ष ॲड. अमोल भुतकर, ऍड. श्रीकांत केंजळे, ऍड. पुरुषोत्तम बारसावडे, ऍड. तानाजीराव पवार, ऍड. धैर्यशील घार्गे आदी मान्यवर उपस्थित होते.
ॲड. उज्वल निकम पुढे म्हणाले, वकिली व्यवसायामध्ये पक्षकार आणि साक्षीदार यांना कमी लेखण्याची चूक करू नये. पक्षकार हा जागरूक असतो याचे भान ज्युनिअर वकिलांनी ठेवले पाहिजे. त्यांनी कोरेगाव कोर्टातील वकिलांना मार्गदर्शन करताना प्रचलित असणारे कायदे आणि आता नव्याने येऊ घातलेले कायदे, यावर तौलानिक अभ्यास करून नवीन कायदे तयार होत असतात. त्यामध्ये वकील संघटनांनी साकल्याने अभ्यास करून कायदा निर्मितीच्या प्रक्रियेत आपला सहभाग नोंदविला पाहिजे. वकिली व्यवसायाला गतिमान युगामध्ये खूप आव्हानांना तोंड द्यावे लागणार आहे. नित्यनियमाने होणारे बदल आणि त्यामधील अडचणी यावर मात करण्यासाठी न्यूनगंड झटकून वकिलांनी प्रयत्न करावेत आणि या व्यवसायामध्ये आपले अस्तित्व निर्माण करावे असे आवाहन ॲड.उज्वल निकम यांनी केले.
यावेळी ॲड प्रभाकर बर्गे, ॲड.शशिकांत बगाडे, ॲड. अशोककुमार वाघ, ॲड. अनिल फाळके, ॲड. इरफान जमादार, ॲड. ओंकार शेटे, ॲड. भैय्या जगदाळे, ॲड. महेश शेडगे, ॲड. संदेश माने, ॲड. आर एस मुळे, सचिव ॲड. धैर्यशील घार्गे, ॲड. सतीश कदम, ॲड. निलेश झांजुर्णे , ॲड. अभिजीत केंजळे, ॲड. मृदुला बारसावाडे, ॲड. गायत्री मतकर, ॲड. तृप्ती भोसले, ॲड. नीता घाडगे, ॲड. संजीवनी कांबळे, ॲड. कु. अपूर्वा बर्गे, सहसचिव ॲड. आकाश निकम, खजिनदार ॲड. मंगेश बळे, सदस्य ॲड. शितल साळुंखे, ॲड. प्रतीक फाळके, ॲड. महेश गोडसे आदी बार असोसिएशनचे सदस्य उपस्थित होते. सूत्रसंचालन ॲड. रणजित भोसले यांनी तर प्रास्तविक ॲड. अमोल भूतकर यांनी केले. आभार ॲड. महेश शेडगे यांनी मानले.