कराडात मणिपूरमधील घटनेचा निषेध : विविध संघटनांचा मूकमोर्चा

कराड | देशात महिलांवरील अत्याचार वाढले आहेत. मणिपूर येथे महिलांवर झालेले अत्याचार हे मन हेलवून टाकणारे आहेत. अत्याचारा विरोधात तमाम महिलांनी पेटून उठले पाहिजे. रस्त्यावर उतरून न्याय मागितला पाहिजे अशा भावना शनिवारी कराडात अनेक महिलांनी व्यक्त केल्या. कराडात मणिपूर घटनेच्या निषेधार्थ काढण्यात आलेल्या मुक मोर्च्याच्या समारोप प्रसंगी अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
कराड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चाैक ते छ. शिवाजी महाराज पुतळा दत्त चाैक या मार्गावर मूक मोर्चा काढण्यात आला. यावेळी काँग्रेस महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षा गीतांजली थोरात, तालुका अध्यक्षा विद्या थोरवडे, वैशाली सोनावले, आनंदराव लादे, डॉ. सुधीर कुंभार, वैशाली रायते, अझर पटेल, अॅड. पंडीत गायकवाड, विद्याधर गायकवाड यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. मणिपूर येथे झालेल्या महिला अत्याचाराच्या निषेधार्थ कराडमध्ये भारतीय संविधान सभा, समता सामाजिक संस्था यासह विविध सामाजिक संस्थांच्या वतीने शनिवारी मूक मोर्चा काढण्यात आला.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आणि संविधान प्रस्ताविकेचे वाचन करून मूक मोर्चास प्रारंभ झाला. यावेळी आंदोलकांनी तोंडावर व दंडावर काळ्या फिती बांधून मणिपूर मधील केला. मणिपूरमधील घटनेचा निषेध मूक मोर्चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून महात्मा फुले चौक, बापूजी साळुंखे पुतळ्यापासून- दत्त चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत काढत, आंदोलकांनी मणिपूर मधील घटनेचा निषेध नोंदवला.