महाराष्ट्र माझा आणि मी मोदी साहेबांचा फॅन : अभिजीत बिचुकले

सातारा प्रतिनिधी | वैभव बोडके
आयोध्या येथील राममंदिराच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यातील पोवई नाक्यावर अभिजीत बिचुकले यांनी मोठा बॅंनर लावला असून चर्चेंचा विषय बनला आहे. सातारा येथे माध्यमांशी बोलताना अभिजीत बिचुकले म्हणाले, महाराष्ट्र माझा फॅन आहे आणि मी मोदी साहेबांचा फॅन आहे. मोदी साहेबांचा एक बॅनर आला होता, ज्यामध्ये छोट्या बाल रुपात श्री रामांना घेऊन बोटाला धरून ते अयोध्येत चाललेत ही त्यांची मोठी चूक असल्याचंही बिचकुलेंनी म्हटले आहे.
साताऱ्यात बिग बाॅस फेम अभिजीत बिचुकलेंनी आपली प्रतिक्रिया दिली असून प्रभू श्री राम हे संपूर्ण जगताचे आहेत. ते एका जातीचे धर्माचे नाहीत, असं कुठे नाही त्यांना आपण ईश्वर मानतो. ईश्वर अल्ला ते देव असतील तर दानवही आहेत. काही दानव ही असतात. मी नेहमी प्रभू श्री राम, श्री कृष्णा आणि माझे आई वडिलांचा भक्त आहे. म्हणून तशा पद्धतीने मी बॅनर लावलेला आहे. श्रीरामांच स्वागत होतंय चांगली गोष्ट आहे. पण मंदिर अपूर्ण अवस्थेत असताना प्रभू रामचंद्रांना आणणं किती योग्य हे जर पाप असेल तर हे पाप मोदींच्या मस्तकी जाईल. प्रभू श्री रामांच आम्ही स्वागत करतोय त्याच पुण्य आम्हांला मिळेल.
शिव्या घालणाऱ्या प्रवृत्तीचा निषेध
जेवढ आम्ही प्रभू श्री रामांना मानतो. तेवढच आम्ही देशाचा संविधानाला मानतो. आयोध्येमधे जर उत्सवच घ्यायचा होता, तर राम नवमीला घ्यायचा होता. प्रभु श्रीराम यावर राजकारण होतय तसेच भवग्या रंगाच महत्त्व आहे. श्री राम यांचा आहे, गौतम बुद्धांचा आहे. उगीच भगवा रंग घालून मुझे चड गया भगवा रंग म्हणत दुसऱ्या समाजातल्या लोकांना शिव्या द्यालणाऱ्या नीच प्रवृत्तींचा मी निषेध करतो, असेही अभिजीत बिचुकले म्हणाले.