ताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रमुंबईराजकियराज्यसातारा

राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे मनसे पक्ष अडचणीत : प्रवीण दरेकर

कराड | राज ठाकरेंचे शरद पवार साहेबांसारखं झालेले आहे. ठाकरे आपल्या भूमिका वर ठाम नसतात. राज ठाकरे हे काल काय बोलतात, आज काय बोलतात आणि उद्या काय बोलतात. त्यांच्या बदलत्या भूमिकेमध्ये राज ठाकरेंच्या पक्षालाही राजकीय वाटचाल करताना अडचणी येत आहेत. विचार, भूमिका ठाम असल्या की पक्षाला अडचणी येत नाहीत, असा टोला त्यांनी लगावला. नरेंद्र मोदी हे पंतप्रधान व्हावेत म्हणून बोलणारे तेच आणि पंतप्रधान झाल्यानंतर त्यांच्यावर टीका करणारे राज ठाकरेच असे प्रत्युत्तर त्रिंबकेश्वर मंदिरातील मुद्द्यावरून राज ठाकरेंना भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी दिले.

माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी कराड ते सातारा निघालेल्या वारी शेतकऱ्यांची पदयात्रेला कोर्टी (ता. कराड) गावच्या हद्दीत विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी भेट देऊन शेतकऱ्यांचे प्रश्न जाणुन घेऊन मार्गदर्शन केले. शेतकरी प्रश्नाबाबत शिंदे फडणवीस सरकार सकारात्मक असल्याचा संदेश घेऊन मी या पदयात्रेला भेट देण्यासाठी आलो असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

प्रविण दरेकर म्हणाले, सत्ताधाऱ्यांना काहीतरी अपेक्षा आहेत, म्हणून चौकशी सुरू असल्याचा आरोप शरद पवार यांनी केला होता. यावर प्रवीण दरेकर म्हणाले, अशाप्रकारे अपेक्षापूर्तीसाठी ईडीलाच कामाला लावले असते. जर काही तथ्य नसेल तर ईडीला चौकशीला जाण्यात घाबरायचं काय? परंतु ईडीने बोलवलं की आम्हालाच बोलवलं, आमच्यावर कारवाई केली जाते. असं बोलून लांब जाता येत नाही, तसेच भाजपच ईडी राबवत असल्याचा आरोप करण्यात येत आहे याला काही अर्थ नाही.

पुरोगामित्वाचे ढोल बडविणाऱ्यांनी उत्तर द्यावं
कर्नाटक राज्यात काँग्रेस कडून विधान भवन शुद्धीकरण करण्यात आले यावर प्रवीण दरेकर म्हणाले, आम्हाला शुध्दीकरणाचे धडे शिकवणाऱ्यांना विचारा. एका बाजूला आमच्यावर टीका करायची व अशा प्रकारची घटना घडली की आम्हाला कोंडीत पकडायचे. त्या प्रकारचं वागणं कुठल्या धर्मात, व्यवस्थेत बसतं याचं उत्तर पुरोगामित्वाचे ढोल बडवणाऱ्यांनी द्यावं. असे आव्हान त्यांनी दिले.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker